OTT प्लॅटफॉर्म, ऑनलाईन न्यूज पोर्टलला सरकारची 15 दिवसांची डेडलाईन | गाइडलाइन्सवर काय केले सांगावे
नवी दिल्ली, २७ मे | केंद्र सरकारने सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी माहिती व प्रसारण विभागाने डिजिटल माध्यमांसह ओटीटी प्लॅटफॉर्मला 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. त्याअंतर्गत अशा कंपन्यांना सांगावे लागेल की नव्या मार्गदर्शक सूचनांच्या बाबीत काय केले गेले.
25 फेब्रुवारी रोजी केंद्रातील मोदी सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि नियम कठोर केले. सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडिया कंपन्यांना 3 महिने दिले होते. केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाची अंतिम मुदत 25 मे रोजी संपली.
अशा परिस्थितीत, केंद्राची नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू न करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतात बंदी घालण्याचा धोका आहे. यापूर्वी टूलकिट वाद आणि सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांविषयी गुरुवारी ट्विटरने म्हटले आहे की, सरकारकडे मुदतीची अंमलबजावणी करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे.
दरम्यान, बुधवारी या नियामावलीवरोधात व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी निवेदनाद्वारे ही प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयात जाण्याची व्हॉट्सअॅपची कृती चुकीची असल्याचे सरकारने म्हटले होते. तसेच नियम पालनाबाबत स्थिती अहवाल सादर करण्याची सूचना केंद्र सरकारने समाजमाध्यम कंपन्यांना बुधवारी केली. नव्या नियमावलीनुसार नेमलेल्या मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार-निवारण अधिकारी आणि संपर्क अधिकारी यांचा तपशील देण्याची सूचनाही केंद्राने या कंपन्यांना केली आहे.
News English Summary: The central government has started taking strict steps to comply with social media guidelines. On Thursday, the Information and Broadcasting Department set a 15-day deadline for the OTT platform, including digital media. Under it, such companies will have to be told what has been done with regard to the new guidelines.
News English Title: Union govt deadline to OTT platform and Digital news portals over new guidelines news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY