18 January 2025 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

Whatsapp Facebook Instagram Reconnect | व्हॉट्सॲप, FB, इन्स्टाग्राम 6 तासानंतर सुरू

Whatsapp Facebook Instagram Reconnect

मुंबई, ०५ ऑक्टोबर | फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्म संपूर्ण जगभर सुमारे एक तास बंद (Whatsapp Facebook Instagram Reconnect) राहिले, ज्यामुळे कोट्यवधी युजर्सला समस्यांना सामोरे जावे लागले. सोमवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही समस्या समोर आली. यानंतर लोकांनी लगेच ट्विटरवर प्रतिक्रिया देणे सुरू केले. या आउटेजचा परिणाम अमेरिकन बाजारातील फेसबुकच्या शेअर्सवरही दिसून आला आणि कंपनीचे शेअर्स 6%ने कमी झाले. फेसबुकचे जगभरात 2.85 अब्ज मासिक सक्रिय युजर्स आहेत. तर व्हॉट्सॲपचे 2 अब्ज आणि इंस्टाग्रामचे 1.38 अब्ज युजर्स आहेत.

Whatsapp Facebook Instagram Reconnect. Facebook, Instagram and WhatsApp at least partially reconnected to the global internet late on Monday afternoon, nearly six hours into an outage that paralyzed the social media platform :

याप्रकरणी फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामने स्पष्टीकरण दिले. व्हॉट्सॲपने म्हटले की, सध्या काही लोकांना समस्या येत असल्याचे आम्हाला माहीत आहे. फेसबुकने ट्वीट करत माफी मागितली आणि म्हटले की, काही लोकांना आमचे ॲप तसेच उत्पादनांपर्यंत पोहोचण्यास समस्या येत आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही सर्व गोष्टी लवकरच सुरळीत करण्यासाठी काम करत आहोत. ही समस्या का उद्भवली हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. तथापि, युजर्स सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी मांडत आहेत. या सेवा बंद होताच युजर्स ट्विटरवर आले व ते तपासले. ट्विटरवर लोकांनी आपापले स्क्रीनशॉट्स शेअर केले होते आणि या तिन्ही सेवा सुरू नाहीत, असे सांगितले होते.

जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सोशल मीडियावर:
फेसबुक आणि त्याचे सर्व मीडिया प्लॅटफॉर्म रात्री उशिरापर्यंत बंद राहिल्याने जगभरातील युजर्सची मोठी अडचण झाली. या वर्षी जुलैच्या एका अहवालानुसार जगाच्या लोकसंख्येच्या ५६.८ टक्के लोक सोशल मीडियाचे ॲक्टिव्ह युजर्स आहेत. त्यात सर्वाधिक फेसबुकचे युजर्स आहेत.

सिनेटच्या समितीसमोर फेसबुकवर वक्तव्य:
फेसबुकच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांच्या मुलाखतीच्या प्रसारणानंतर व मंगळवारी सिनेटच्या समितीसमोर त्यांच्या वक्तव्याआधी सर्व्हर डाऊन झाले. हॉगेन यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकबाबत हजारो पानांचे गोपनीय दस्तऐवज लीक केले आहेत. द्वेष, हिंसा व दुष्प्रचारासाठी आपल्या प्लॅटफॉर्मचा कशा प्रकारे वापर होत आहे याची संपूर्ण माहिती फेसबुकला आहे, पण कंपनी हे पुरावे दडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Whatsapp Facebook Instagram Reconnect to the global internet.

हॅशटॅग्स

#facebook(30)#Instagram(6)#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x