5 February 2025 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

Whatsapp New Feature | व्हॉट्सॲपवर नवीन फिचर! आता युजर्स चॅनेल सबस्क्राईब करू शकणार, अधिक जाणून घ्या

Whatsapp New Feature

Whatsapp New Feature | मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप एक दमदार फीचर घेऊन येत आहे ज्यामुळे युजर्सना चॅनेल तयार करण्याचा पर्याय मिळेल आणि त्यांना सबस्क्रायब करण्याचा पर्यायही मिळेल. हे नवीन फीचर आल्यानंतर युजर्सना अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत ज्यामध्ये युजर्स आपल्या आवडत्या चॅनेलचे सब्सक्रिप्शन घेऊ शकतात आणि त्या चॅनेलवरील सध्याचा कंटेंट पाहू शकतात आणि तुम्ही कोणत्या चॅनेलला सबस्क्राइब केले आहे याची माहितीही लोकांना मिळणार नाही. एखाद्या चॅनेलची सदस्यता घेतल्यावरच तुम्हाला त्या चॅनेलबद्दल माहिती मिळू शकते.

मात्र, त्या चॅनेलला कोणी सबस्क्राइब केलं आहे हे तुम्हाला कळणार नाही. चॅनेलवर सबस्क्राइब केलेले सर्व लोक तुम्ही पाहू शकाल पण त्यांचा नंबर तुम्हाला दिसणार नाही. आपण त्यापैकी काही नंबर्स ऍड केले असतील किंवा ऍड केले नसतील तरी आपल्याला त्यांची लिस्ट दिसेल, फक्त आपल्याला त्यांचे नंबर मिळणार नाहीत.

टेलिग्रामसारखे आहे हे फिचर
व्हॉट्सॲपवर येणारे हे फीचर टेलिग्राम चॅनेल फीचर मानले जात आहे ज्यावर लोक सबस्क्रायब करतात आणि त्या चॅनेलवरील कंटेंटचा फायदा घेतात. हे फीचर काही वेळातच युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे, सध्या हे फीचर अँड्रॉइड 2.23.8.6 मध्ये पाहायला मिळाले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना आवश्यक अपडेट्स सहज मिळू शकतील आणि त्यासाठी वेळ लागणार नाही. या चॅनेलवर येणारे सर्व मेसेज एन्क्रिप्टेड होणार नाहीत.

व्हॉट्सॲप चॅनेल हँडलला सपोर्ट करेल जेणेकरून युजर्स व्हॉट्सॲपच्या आत युजरनेम सर्च करून विशिष्ट व्हॉट्सॲप चॅनेल सर्च करू शकतील. टेलिग्रामच्या चॅनेल फीचरपेक्षा हे फीचर खूपचांगले असेल आणि युजर्सना यात अनेक मोठे फीचर्स दिसतील, त्यामुळे आता व्हॉट्सॲप वापरणाऱ्या युजर्सना हे फीचर वापरण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Whatsapp New Feature channel feature to keep users updated details on 09 April 2023.

हॅशटॅग्स

#WhatsApp New Feature(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x