21 February 2025 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

WhatsApp Update | आता व्हाट्सअप थीममध्ये मिळणार रंगीबेरंगी फीचर्स, एका क्लिकवर फीचर्स असे सेट करा

WhatsApp Update

WhatsApp Update | भारतातच नाही तर देशभरातील करोडो नागरिक व्हाट्सअपशी जोडलेले आहेत. व्हाट्सअप चॅट माध्यमातून लाखोंच्या संख्येने माहितीची देवाण-घेवाण केली जाते. आज-काल मित्र-मैत्रिणींना फोन करून एखादी गोष्ट सांगण्यापेक्षा थेट चॅटद्वारे आपण समोरच्यापर्यंत आपलं म्हणणं पोहोचवू शकतो. व्हाट्सअप चॅट हे अतिशय जलद गतीने माहिती संप्रेषणाचे साधन ठरले आहे.

दरम्यान व्हाट्सअप कंपनी आपल्या यूजर्ससाठी कायम नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. व्हाट्सअपने आपल्या युजर्सना रंगीबिरंगी चॅट थीमसह मजेशीर संवाद साधता यावा यासाठी नवीन थिम फीचर आणले आहे.

व्हाट्सअपने आणले एकूण 30 थीम्स आणि वॉलपेपर :
1. व्हाट्सअपने आपल्या नवीन थीम चॅट फीचरची घोषणा अधिकृत x अकाउंट म्हणजेच पूर्वीचे ट्विटरवर शेअर केली आहे. या नवीन चॅट थीम फिचरमुळे युजर्सना मजेशीर आणि रंगीबिरंगी चॅट थीम सेट करता येणार आहे.

2. व्हाट्सअपने आणलेल्या या नवीन फीचरमध्ये युजर्सना वेगवेगळ्या चॅटला वेगवेगळी थीम सेट करता येणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण चॅटसाठी केवळ एकच थीम देखील सेट करता येणार आहे.

3. whatsapp ने लॉन्च केलेल्या हे नवीन चॅट थीम फीचर्स इतके अनोखे आहे की, यामध्ये वेगवेगळे प्रिसेट थीम सेट करण्यात आले आहेत. या रंगीबेरंगी थीम चार्ट बबल आणि चॅटचे मागील बॅकग्राऊंड आपोआप सेट करतात.

4. महत्त्वाचं म्हणजे व्हाट्सअप युजर्सना अनोखे आणि आकर्षित 30 वॉलपेपर देखील देण्यात आले आहे. हे वॉलपेपर तुम्ही थेट गॅलरीमधून देखील अपलोड करू शकता.

कशा पद्धतीने थीम सेट कराल इथे पहा :
1. सर्वप्रथम तुम्हाला व्हाट्सअप चॅट ओपन करायची आहे. त्यानंतर वरील तीन टिंबांवर क्लिक करून सेटिंग्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

2. सेटिंग्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय दिसतील. यामध्ये default chat theme या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

3. त्यानंतर तुमच्यासमोर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आणि मजेशीर थीम ओपन होतील. यामधील तुम्ही तुम्हाला हवी तशी थीम सेट करू शकता.

4. तुम्ही केवळ एका विशिष्ट चॅटमध्ये जाऊन देखील तुमची आवडती थीम निवडू शकता. यासाठी तुम्हाला विशिष्ट चॅट बॉक्समध्ये जाऊन वरील बाजूस थ्री डॉट मेनू उघडायचा आहे आणि चॅट थीम पर्याय निवडून तुमच्या आवडीप्रमाणे थीम आणि वॉलपेपर सेट करायचे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

WhatsApp Update(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x