एकाच मोबाईलवर दोन WhatsApp अकाउंट कसे वापराल? | या आहेत स्टेप्स

मुंबई, ०२ मार्च: सध्याच्या जीवनात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे आपण आपली बहुतांश कामे पार पाडण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतो. तसेच ही कामे करण्यासाठी स्मार्टफोन मध्ये विविध अॅप्लिकेशन्स सुद्धा दिले जातात. यामधील एक लाखो-करोडोंच्या संख्येने युजर्स असलेले WhatsApp सध्या एकमेकांना जोडण्यासाठी महत्वाचे काम करत आहे. या अॅप्लिकेशनमध्ये असे काही फिचर्स आहेत त्याबद्दल आपल्याला कधीच माहिती नसते. पण दुसरा व्यक्ती वापरत असताना ते पाहून आपल्याला सुद्धा त्याची उत्सुकता लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एकाच मोबाईल मध्ये दोन व्हॉट्सअॅपचे अकाउंट कसे तुम्ही वापरु शकता याबद्दल सांगणार आहोत. त्यासाठी काही सोप्प्या ट्रिक्स फक्त वापरण्याची गरज आहे. (Today we are going to tell you how you can use two WhatsApp accounts in one mobile. All you need to do is use a few simple tricks)
पहा कसे तुम्ही दोन व्हॉट्सअॅप अकाउंट एकाच मोबाईल मध्ये कसे वापरु शकता:
- एकाच स्मार्टफोनमध्ये दोन व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी प्रथम मोबाईलच्या सेटिंग मध्ये जावे लागणार आहे.
- तेथेच खाली तुम्हाला अॅप्लिकेशन आणि परमिशन असे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यास तुम्हाल अॅप क्लोनचा ऑप्शन ही मिळेल. यावर क्लिक करा.
- अॅप क्लोनमध्ये तुम्हाला फोनमधील सर्व अॅप्लिकेशन पहायला मिळतील. त्यामध्ये WhatsApp वर क्लिक करा. येथे क्लोन अॅप असे ही ऑप्शन दिसेल ते केल्यानंतर व्हॉट्सअॅप क्लोन बनेल.
- मुख्य म्हणजे तुमच्या सेटिंगमध्ये हे फिचर नसल्यास वरील बाजूस असलेल्या सर्च बारमध्ये अॅप क्लोन, ड्युअल अॅप किंवा Twin असे लिहून सर्च करु शकता. असे केल्यास तुम्हाला थेट अॅफ क्लोनपर्यंत पोहचता येईल.
फोनमध्ये स्पेशल फीचर कोणत्या नावाने मिळेल:
सध्या जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये पॅरलल अॅपचे फीचर दिले जात आहे. फीचर वेगवेगळे कंपनीच्या फोनमध्ये हे फीचर वेगवेगळ्या नावाने मिळते. खास बाब म्हणजे, या फीचरने कोणत्याही अॅपला क्लोन बनवले जाऊ शकते. हे फोनच्या कोणत्याही अॅपच्या हुबेहुब क्लोन तयार करतो. ज्यात तुम्हाला दुसरे अकाउंट चालवता येऊ शकते.
कोणत्या कंपनीच्या फोनमध्ये कोणत्या नावाचे फीचर मिळते, पाहा.
- सॅमसंग स्मार्टफोनः ड्यूअल मेसेंजर
- शाओमी स्मार्टफोनः ड्यूअल अॅप्स
- रियलमी स्मार्टफोनः क्लोन अॅप्स
- वनप्लस स्मार्टफोनः पॅरलेल अॅप्स
- ओप्पो स्मार्टफोनः क्लोन अॅप्स
- विवो स्मार्टफोनः अॅप क्लोन
- आसुस स्मार्टफोनः ट्विन अॅप्स
News English Summary: Today we are going to tell you how you can use two WhatsApp accounts in one mobile. All you need to do is use a few simple tricks.
News English Title: You can use two WhatsApp accounts in one mobile news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB