22 April 2025 4:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

पालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात? | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...

Child is playing online game

मुंबई, १३ जुलै | तुमच्या मुलांना तुम्ही ऑनलाईन गेम खेळायला देत असाल तर आताच सावध व्हा. कारण हे ऑनलाइन गेम मुलांसह तुमच्या कुटुंबियांसाठी घातक ठरू शकतात. हॅकर्सकडून या गेम्सच्या माध्यमातून माहितीचा गैरवापर होत असल्याचं लक्षात आलं आहे आणि सायबर विभागानेही सतर्क केलं आहे.

मुलांचा वेळ जावा म्हणून मुलं मोबाईलवरच आपला विरंगुळा शोधू लागली, काही पालकांनीही आपल्या मुलांच्या हातात मोबाईल दिला. मात्र त्यामुळे सायबर गुन्हेगार आता ऑनलाइन गेमच्या नावाखाली मुलांचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्नात असल्याचं निदर्शनास आलं आहे.

तुमच्याकडे लहान मुलं ऑनलाईन गेम खेळत असतील किंवा सतत मोबाइलचा वापर करीत असतील, तर पालकांनी सावध होण्याची गरज आहे. कारण लहान मुलांचे सायबर गुन्हेगारांकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याचे प्रकार पुढे येत आहे. मध्यंतरी नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 12 वर्षाची मुलगी फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळात असे. यादरम्यान सायबर गुन्हेगारांनी तिला आपल्या जाळ्यात अडकवले. धक्कादायक बाब म्हणजे तिला अश्लिल व्हिडीओ बनवण्यास भाग पाडण्यात आले.

अनेक गेम्समध्ये पैसे भरायलाही सांगितलं जातं. मात्र अशावेळी बँक डिटेल्स किंवा तुमच्या फोनमधून तुमचा आवाज, फोटोचा अक्सेसही दिला जातो. अशात तुमची अतिशय गोपनीय माहितीसुद्धा या हॅकर्सना अगदी सहजरित्या मिळू शकते. अनेक संकेतस्थळं म्हणजेच वेबसाईट ह्या बनावटही असू शकतात. तेव्हा तुमची मुलं कॉम्प्युटरवरही ऑनलाईन गेम खेळत असतील, तर तुमच्या कॉम्प्य़ुटरमधलाही डेटा हॅकर्सच्या हाती लागण्याची शक्यता आहे. लहान मुलांना ऑनलाईन फसवणुकीबाबत फार माहिती असतेच असं नाही, अशात ते स्वत:हूनही गोपनीय माहिती दुसऱ्याला देण्याची चूक करू शकतात. त्यामुळे पालकांनीच अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

पालकांनी काय खबरदारी घ्यावी?
* लहान मुलांनी कोणत्याही ऑनलाइन गेमच्या लेवल खरेदी करण्यापूर्वी पालकांचा सल्ला घ्यावा.
* आपल्या परवानगीशिवाय मुलांना गेम सुरू करू देऊ नका. आपली मुलं खेळत असलेला गेम सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा.
* पालकांनी आपली मुलं कोणत्या दर्जाचा ऑनलाइन गेम खेळत आहेत याबाबत सतर्क राहावे.
* मुलांना खेळण्यासाठी वैयक्तिक मोबाइल किंवा ऑफिस मोबाइल, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही डिवाइस देण्याचं टाळावं.
* आपल्या मुलांना ऑनलाइन गेम खेळण्यासाठी मोबाइल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसारखे कोणतेही डिव्हाईस देण्यापूर्वी त्यात आपला बँक तपशील नाही ना? याची खात्री करून घ्या.
* आपला आर्थिक डेटा, बँक खाते तपशील, डेबिट-क्रेडिट कार्ड पिन क्रमांक लहान मुलांना कळू देऊ नका.
* आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवा. आधी वास्तविक जगात नंतर ऑनलाइन गेमिंग जगात त्यांना जगायला शिकवा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Your child is playing online game then read this alert news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या