11 January 2025 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

Zomato Food Quality | झोमॅटोमार्फत खराब अन्न पुरवणारे रेस्टॉरंट, स्टॉल्स ऑनलाइन ऑर्डरपासून ब्लॉक होणार

Zomato Food Quality

मुंबई, 15 एप्रिल | फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आरोग्यासाठी हानिकारक अन्न पुरवणाऱ्या रेस्टॉरंट्सविरोधात कठोर भूमिका घेणार आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) कडून थर्ड पार्टीची तपासणी होईपर्यंत कंपनी रेस्टॉरंटला ऑनलाइन ऑर्डरपासून तात्पुरते (Zomato Food Quality) दूर ठेवेल. कंपनीने असेही म्हटले आहे की गंभीर आणि वारंवार गुन्ह्यांच्या बाबतीत, रेस्टॉरंट्स ऑनलाइन ऑर्डरपासून दूर होतील.

Food delivery platform Zomato will temporarily keep the restaurant away from online orders till the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) approved third party inspection is done :

झोमॅटोने आपल्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी असलेल्या सर्व फूड सप्लायर्स आणि रेस्टॉरंटला खराब अन्न पुरवठ्याबद्दल नोट पाठवली आहे आणि त्यानुसार अपात्र ठरवण्याआधी 18 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून, झोमॅटोनेने आपल्या नवीन ‘फूड क्वालिटी पॉलिसी’चे पालन न करणाऱ्या रेस्टॉरंट्सना काढून टाकण्याची योजना आखली आहे. ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी नवीन धोरणाचा हा एक भाग आहे असं कंपनीने म्हटले आहे.

झोमॅटोने नोटमध्ये काय म्हटले आहे :
झोमॅटोने सांगितले की, “खाद्य गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी असलेल्या रेस्टॉरंटना आमच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले जाईल.” कंपनीने म्हटले आहे की जोपर्यंत FSSAI द्वारे मान्यताप्राप्त थर्ड पार्टीची तपासणी होत नाही तोपर्यंत झोमॅटो संबंधित रेस्टॉरंटला ऑनलाइन ऑर्डर स्वीकारण्यास नकार देईल. यासोबतच तपासणीचा खर्च रेस्टॉरंट उचलणार असल्याचेही झोमॅटोने म्हटले आहे. यात असेही म्हटले आहे की गंभीर आणि वारंवार गुन्ह्यांसाठी, रेस्टॉरंट्सना झोमॅटोवर ऑनलाइन ऑर्डर घेण्यास बंदी घातली जाईल.

प्लॅटफॉर्मवर नोंदणी असलेल्या रेस्टॉरंटला नोट पाठवली :
पार्टनर रेस्टॉरंटना पाठवलेल्या नोटमध्ये, कंपनीने म्हटले आहे की, “ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर हानी पोहोचवणारी कोणतीही अन्न गुणवत्ता तक्रार गंभीर अन्न गुणवत्ता तक्रार म्हणून वर्गीकृत केली जाईल.” नोटमध्ये असे म्हटले आहे की, उदाहरणार्थ, अन्नामध्ये कीटक, कालबाह्य झालेले अन्न, शाकाहाराऐवजी मांसाहारी अन्न देणे इ. ग्राहकांची तक्रार आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Zomato Food Quality policy in focus check details 15 April 2022.

हॅशटॅग्स

#Zomato(3)#Zomato Food Quality(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x