25 November 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
x

VIDEO : महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ अडकली, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी

mahalaxmi express, Eastern Railway, Western Railway, Mumbai, Heavy Rain

ठाणे : मुसळधार पावसामुळे बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

पहाटे तीन वाजल्यापासून रेल्वे रुळावरच असल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही लोक दोरी आणि बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य घेऊन आले आहेत. पहाटेच्या तुलनेत आत्ता रुळांवर साठलेले पाणी सहा इंचांपर्यंत कमी झाले आहे. पाणी ओसरत असल्याने सध्या काळजी वाटत नाही मात्र पाणी वाढले एक्स्प्रेसही पुढे जाईना तेव्हा आमच्या काळजाचा ठोका चुकला होता असं रेल्वेत अडकलेला प्रवासी स्वप्निल लुगडे याने सांगितलं आहे. स्वप्निल जुना बुधवार पेठ, कोल्हापूरचा रहिवासी आहे.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x