22 December 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

गणेश नाईक समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीत परतणार; अजित पवारांशी भेट झाल्याचं वृत्त

Deputy CM Ajit Pawar, Ganesh Naik, Navi Mumbai

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पक्षात आणून संपूर्ण शहरात शिवसेनेला एकही जागा दिली नव्हती. दरम्यान, महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर गणेश नाईक यांसोबत भाजपात गेलेले समर्थक पक्षात आणण्याची योजना आखली आहे. त्यासाठी शिवसेनेतील मोठ्या नेत्यांवर जवाबदारी देऊन गणेश नाईक समर्थक नगरसेवकांशी संपर्क सुरु झाला आहे. मात्र यामध्ये शिवसेनेला राष्ट्रवादीची देखील साथ मिळाली असून आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची योजना दोन्ही पक्ष आखात असल्याचं वृत्त आहे. त्यानुसार दोन्ही पक्षातील मंत्रिपदावरील नेते देखील प्रत्यक्ष लक्ष ठेऊन आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला खिंडार पडणार असल्याची माहिती आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत पालिकेवर एनसीपी’ची सत्ता संपुष्टात आणून भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला होता. पण आता भारतीय जनता पक्षाचे ११ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

याच ११ नगरसेवकांमधील ४ नगरसेवकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. त्यामुळे या नगसेवकांचा राष्ट्र्वादीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. लवकरच राज्यातील महामंडळांचं वाटप देखील होणार असल्याने स्थानिक मोठे पदाधिकारी आस लावून बसल्याने राष्ट्रवादीला त्याचा नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी फायदा होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: BJP Corporators from Navi Mumbai may Join shivsena after meet with Deputy CM Ajit Pawar.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x