15 January 2025 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

मनसे, काँग्रेसच्या मदतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आर्थिक नाड्या भाजपाकडे

MNS, Raj Thackeray, Kalyan Dombivali, KDMC, MLA Raju Patil

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विकास म्हात्रे यांनी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने विजय मिळवून सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला. काँग्रेस आणि मनसेने भारतीय जनता पक्षाला मदत केल्यामुळे निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ समसमान झाले होते. परंतु, ऐन मतदानाच्या दिवशी शिवसेनेचा एक सदस्य आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकला नाही आणि त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार गणेश कोट यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तुटल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले होते. स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे ८, भारतीय जनता पक्षाचे ६ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून गणेश कोट यांनी तर, त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शुक्रवारी ऐन निवडणुकीवेळी शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे हे आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाल्याने गैरहजर राहिले. त्यामुळे शिवसेनेचे एक मत कमी झाले. मात्र, तरीही राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न कल्याण-डोंबिवलीत राबवून आपलाच विजय होईल, असा ठाम विश्वास शिवसेनेला होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत वेगळेच चित्र दिसले. काँग्रेसच्या हर्षदा भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरोज भोईर यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केल्याने ८ मते मिळवून विकास म्हात्रे सभापतीपदी विराजमान झाले.

गेल्या पाच वर्षात शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झाल्यानंतर पद वाटपाबाबत निर्णय झाले होते. ठाणे महापालिकेचे उपमहापौरपद किंवा स्थायी समिती, उल्हासनगर महापालिकेत सव्वा वर्षे महापौरपद भारतीय जनता पक्षाला देण्याचा निर्णय झाला होता. तसेच केडीएमसीत शेवटचे वर्षे भारतीय जनता पक्षाचा महापौर असावा असा निर्णय झाला होता. गेले काही दिवस आम्ही शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्कात होतो. आपण ठरल्याप्रमाणे महापौरपद किंवा स्थायीचे सभापतीपद द्यावे असे सांगितले. महापौरांनीही राजीनामा दिलेला नाही. महायुतीत ठरलेल्या सर्व गोष्टी ठाण्यातील नेतृत्वाने टाळले. शिवसेनेकडून नेहमीच टाळाटाळ करण्यात आल्याने आम्ही सत्याच्या मार्गाने उमेदवार उभा केला. आणि अखेर सत्याचा विजय झाला आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी सत्याच्या बाजूने राहून मतदान केले आहे असं भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.

 

Web Title:  BJP defeated Shivsena during KDMC standing committee election with help of MNS and congress.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x