24 November 2024 7:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

कल्याण: भाजपच्या बंडखोर आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

MLA Narendra Pawar, Kalyan MLA, BJP Maharashtra, Maharashtra Vidhansabha Election 2019

कल्याण : विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली असताना कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षाला अखेर रामराम ठोकला आहे. नरेंद्र पवार ‘शिट्टी’ या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आपण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नरेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टवरुन जाहीर केले आहे.

शिवसेनेने कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाकडून मागून घेतली होती. या जागेवरुन आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. अखेर विश्वनाथ भोईर यांना शिवसेनेने तिकीट दिले. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी मैदानात आहेत. नरेंद्र पवार यांनी पक्षाने कारवाई करण्यापूर्वीच बाहेर पडणे पसंत केल्याचे समजते.

‘अशाप्रकारे मला भारतीय जनता पार्टीपासून दूर जावे लागेल, असा साधा विचारही कधी मनात आणला नव्हता. मात्र मी कदाचित कुठे कमी पडलो, मलाही कल्पना नाही. २०१४ मध्ये युती नसताना भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर मी कल्याण पश्चिम विधानसभा लढवली आणि जिंकून आलो. पक्षाने मला काम करण्याची संधी दिली तेव्हा मी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम केलं.’ अशा शब्दात नरेंद्र पवारांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.

मी अविरतपणे काम करुनही आता विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमची जागा घटकपक्षाला सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. ज्या भारतीय जनता पार्टीने मला घडवलं, वाढवलं आणि माझ्यातला जनसेवक जागृत ठेऊन सेवा करण्याची प्रेरणा दिली त्या पक्षाला माझ्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये, अशी माझी भूमिका आहे. काही निर्णय वाईट असतात मात्र ते घ्यावे लागतात. आज हा निर्णय घेताना मला मनापासून दु:ख होत आहे. काम करत असताना माझ्याकडून कोणी दुखावले गेले असेल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत नरेंद्र पवारांनी पक्षाला रामराम ठोकला.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x