22 November 2024 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भिवंडी महापालिकेत काँग्रेसला बाजूला करत 'कोणार्क विकास आघाडीचा' महापौर

Bhiwandi Municipal Corporation, Konark Vikas Aghadi, Congress

ठाणे: परस्परविरोधी विचारांची शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आल्याच्या धक्क्यातून जनता सावरत असतानाच भिवंडी महापालिकेत आणखी एक राजकीय चमत्कार घडला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव करून अवघ्या ४ नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीनं भिवंडीचं महापौरपद पटकावलं आहे. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्यानं ही उलथापालथ झाली आहे. ‘कोणार्क’च्या प्रतिभा पाटील निवडून आल्या आहेत.

दरम्यान उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांची निवड झाली आहे. इमरानवल्ली यांना एकूण ४९ मतं मिळाली तर शिवसेनेचे बालाराम मधुकर चौधरी यांना ४१ मतं मिळाली. शिवसेनेचे फक्त १२ नगरसेवक असतानाही राज्यात झालेल्या महाविकास आघाडीमुळे ४१ चा आकडा गाठणं त्यांना शक्य झालं.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

  1. काँग्रेस – ४७
  2. शिवसेना – १२
  3. भाजप – २०
  4. कोणार्क विकास आघाडी – ४
  5. समाजवादी पार्टी – २
  6. आरपीआय (एकतावादी)- ४
  7. अपक्ष – १

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x