10 January 2025 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचा एका महिन्यात मृत्यू

Coronavirus crisis, NCP leader Mahadev Chougule, family died, Due to Covid 19

भिवंडी, २४ ऑगस्ट : जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडीतही वाढला आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला असला तरी कोरोनाने भिवंडीतील वडूनवघर येथील चौघुले परिवारावर घाला घातला आहे. एका महिन्याच्या आत परिवारातील तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

मागील महिन्यात 25 जुलै रोजी चौघुले परिवारातील जैष्ठ सदस्य व ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महादेव बाबुराव चौघुले (76) यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अवघ्या 23 दिवसांनी त्यांचे छोटे बंधू पंडित बाबुराव चौघुले (68) यांचे देखील कोरोनावरील उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. या दोन मृत्यूंमुळे चौघुले परिवारावर शोककळा पसरली.

या दोन मृत्यूनंतर चौघुले परिवारातील महादेव चौघुले यांच्या पत्नी पार्वतीबाई महादेव चौघुले (वय ७०) यांना देखील कोरोना झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विशेष म्हणजे रविवारी त्या कोरोना मुक्त झाल्या असल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. मात्र सोमवारी घरी सोडण्याआधीच त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

चौघुले परिवारात ४५ सदस्य असून तालुक्यातील एकत्र कुटुंब पद्धतीचे आदर्श उदाहरण म्हणून या कुटुंबाकडे पाहिले जाते. या परिवारावर कोरोनाने घाला घातल्याने एकाच महिन्यात तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने चौघुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पार्वतीबाई चौघुले यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन विवाहित मुली , नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

 

News English Summary: Mahadev Baburao Chowghule, 76, a senior member of the Chowghule family and a senior NCP leader from Thane district, died of corona on July 25 last month. Just 23 days after his death, his younger brother Pandit Baburao Chowghule (68) also died at a private hospital while undergoing treatment for corona.

News English Title: Coronavirus crisis three members of NCP leader Mahadev Chougule family died due to Covid 19 in one month News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x