14 January 2025 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका; राज्यपालांचा मनसे बाणा

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, Marathi Language

नवी मुंबई: मराठी भाषेबद्दल राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही राहिली आहे. राज्यात राहणाऱ्या परप्रांतीयांनीं देखील मराठी भाषा शिकलीच पाहिजे हे मनसेचा नेहमीच आग्रह राहिला आहे. इतर भाषिकांच्या कार्यक्रमात देखील मनसे अध्यक्षांनी मराठी भाषेच महत्व मांडलं आहे. त्यामुळे मनसे नेहमीच परप्रांतीय लोंढ्यांच्या नजरेत खुपली आहे. मराठी बद्दलची कोणतीही भूमिका मनसेच्या नेत्यांनी मांडताच त्यावर बातम्या बनतात, मात्र मनसे व्यतिरिक्त एखादी महत्वाची व्यक्ती मराठीचा आग्रह मांडते, तेव्हा मात्र ती भुमीका अत्यंत सौम्य पणे घेतली जाते.

कारण सध्या मनसेचा मराठी बद्दलचा आग्रह सर्वश्रुत असला तरी या विषयावर राज्याच्या राज्यपालांनी मराठीचा आग्रह धरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. ‘महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान व एकतेची भावना आहे. मराठी आणि उत्तराखंडातील पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणे फारसे अवघड नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका,’ असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नवी मुंबईत केले.

उत्तराखंड राज्यात ‘ऍडव्हेंचर टूरिझम’ विकसित करणार असून १२०० कोटी रुपये खर्च करून टेहरी पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री रावत यांनी उत्तराखंड राज्यात सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उत्तराखंड भवन राज्यासाठी सन्मानाचे प्रतीक आहे. पर्यटन, उत्पादन, गुंतवणूकदारांसाठी या भवनात कार्यालय बनवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर जयवंत सुतार यांनी उत्तराखंड सरकारला सर्वोतपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

 

Web Title:  Every person living in Maharashtra should speak Marathi Language says Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x