22 January 2025 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

निसर्ग वादळची नुकसान भरपाई अजून पूर्ण मिळाली नाही | आता महाड इमारतीच्या मदतीची घोषणा

How trust treacherous government, MLA Nitesh Rane, Mahad building accident

भिवंडी, २५ ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील महाड शहरात झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पीएमओकडून ट्विट करुन दुर्घटनेत जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना केली आहे. महाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी अतिशय दु:ख आहे. स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाकडून या दुर्घटनेठिकाणी बचावकार्य सुरु आहे. यासाठी सर्व शक्य ती मदत केली जाणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

राजगड जिल्ह्यातील महाडमध्ये सोमवारी 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या फारुक काझी आणि युनूस शेख या दोन्ही बिल्डरच्या नावे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखालून जवळपास ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. तर अद्यापही 18 जण जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात 8 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी असणारा ढिगारा उचलण्यासाठी सहा ते सात जेसीबी दाखल झाल्या आहेत. शिवाय एनडीआरएफच्या तीन टीमही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रशासन आणि सर्व यंत्रणांकरुन घटनास्थळी वेगात बचावकार्य सुरु आहे.

दरम्यान, राज्य सरकारने या घटनेची दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीक केली आहे आणि त्यांना राज्यातील इतर घटनांची देखील आठवण करून दिली आहे. आमदार नितेश राणे यांनी सरकारवर विश्वास कसा ठेवणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण, निसर्ग वादळच्या तडाख्यात सापडलेल्या रायगडवासीयांना अद्यापही पूर्ण नुकसान भरपाई मिळाली नाही. आता, महाड इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकार नी केली आहे. पण, या विश्वासघाती सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जनतेने ?, असे नितेश राणेंनी म्हटले आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

News English Summary: The state government has taken note of the incident and has announced Rs 4 lakh assistance to the families of the deceased. MLA Nitesh Rane has criticized the government and reminded him of other incidents in the state. MLA Nitesh Rane has raised the question of how he will trust the government.

News English Title: How trust treacherous government MLA Nitesh Rane strikes again after building accident News Latest updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x