6 February 2025 2:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

नवी मुंबई: शिवसेनेतील अंतर्गत वादातून स्वकीयांना जीवे मारण्याच्या धमक्या

Navi Mumbai Shivsena, Vijay Chaugule, Pravin Mhatre

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना अनेक शहरांमध्ये पक्षातील अंतर्गत वाद टोकाला जाताना दिसत आहेत. त्यात नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सेनेच्याच पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.

काल संध्याकाळी ऐरोली येथे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पक्षांतर्गत राजकीय बैठक बोलवली होती. मात्र सदर बैठक शिवसेनेची अधिकृत नसल्याचे इतर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यावरून शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी त्या बैठकीच्या बाबतीत स्थानिकांना माहिती देण्यासाठी स्वतः मेसेज तयार करून ते शिवसेनेच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केले होते. मात्र त्यानंतर संतापलेल्या विजय चौगुले यांनी त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवीण म्हात्रे यांना फोन केला होता. त्यादरम्यान दोघांमध्ये वादविवाद वाढत शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर संतापलेल्या विजय चौगुले प्रवीण म्हात्रे यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार म्हात्रे यांनी कोपरखैरणे पोलीस स्थानकात केली आहे.

पोलिसांकडे तक्रार केली असता विजय चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात विजय चौगुले यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, तसेच प्रवीण म्हात्रे यांनी केलेला दावा खोडून देखील काढला नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x