22 February 2025 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

६५०० कोटीचे कल्याण: फडणवीसांच्या स्मार्ट सिटीचा रोड की उत्तर भारतीयांच्या म्हशींचा तबेला?

Kalyan City, Smart City, kalyan Dombiwali

कल्याण : मागील २ दिवसांपासून ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये संततधार सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे कल्याण आणि नजीकच्या शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली. पावसामुळे रात्री घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे कर्जत लाईनवर तसेच बदलापूर रेल्वे स्थानकात पटरीवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा बंड करण्यात आली होती.

त्यातच कल्याण एसटी आगाराने विशेष बससेवा सुरू केली परंतु रोड वर देखील पाणी साचले असल्यामुळे बस सेवा देखील बंड करण्यात आली होती. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना तारेवरची कसरत करत करुन घरी परतावे लागले. याचाच फायदा घेत रिक्षा चालकांनीही भाडेवाढ केली. दुसरीकडे कल्याणच्या सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.

त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील मोहम्मद अली चौक, मुख्य बाजार पेठवतील दुकांनमध्ये पाणी जोशीबाग, जरीमरी मंदिर परिसरातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले आहे. तर कल्याण पूर्व एफ कॅबिन, कैलास नगर , खडेगोलवली, गॅस कंपनी, शॉपिंग सेंटर, रामा कृष्णा कॉलोनी, राजीव गांधी स्कूल परिसरमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली. शेकडो रहिवशी घर सोडून सुरक्षा ठिकाणी जाऊन आसरा घेत आहे. तर कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरातील अनेक भागात, घरात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान मागील निवडणुकीत याच कल्याण शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचं गाजर मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सर्वश्रुत आहे. त्यावेळी घोषणा करताना त्यांनी शहराच्या पायाभूत सेवांच्या उभारणीसाठी तब्बल ६५०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र मागील ५ वर्षात पैसे काही आलेच नाहीत, मात्र विधानसभा निवडणुका पुन्हा तोंडावर आल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी जेव्हा कल्याणच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा, केडीएमसीनं आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरून मोदींना दुर्गंधी येऊ नये म्हणून थेट कचऱ्यावर सुद्धा परफ्यूमची फवारणी केली होती.त्यामुळे आधारवाडी डंपिंग ग्राऊंडमधून मोदींच्या दौऱ्यादरम्यान दुर्गंधी सुटू नये आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी सर्वात घाणेरडे शहर असा शिक्का मारलेले कल्याण-डोंबिवली शहर स्वच्छ असल्याचा फिल्मी देखावा महापालिकेने केला होता. त्यावरून शहराची बकाल अवस्था सिद्ध झाली होती.

शहरातील बेलगाम रिक्षाचालकांनी शहराच्या ट्राफिक व्यवस्थेचे तीनतेरा केले असताना, मागील २-३ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील उत्तर भारतीयांच्या लोंढ्यांचे प्रमाण आणि त्यांनी पाळलेली जनावरं यांचं वास्तव समोर आलं आहे. कारण कल्याणमधील उत्तर भारतीयांनी स्वतःच्या म्हशींचा जीव वाचवण्यासाठी त्यांना चक्क गोविंद वाडी बायपास रोडवर आणून ठेवलं आहे आणि मुख्य प्रवासाच्या रोडवर तबेला थाटल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे फडणवीसांच्या स्मार्टसिटीचे वास्तव मागील ५ वर्षात सिद्ध झालं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x