15 January 2025 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
x

फडणवीसांना आता दुसरं काम आहे का? ते बिचारे आता असं करणारचं: जयंत पाटील

Opposition Leader Devendra Fadnavis, Minister Jayant Patil

मुंबई: महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नाही, खातेवाटप हे नक्की लवकरात लवकर होईल. फडणवीस म्हणतात तसं थोड्या दिवसांच सरकार हे थोडंथोडं करून पाच वर्षे पूर्ण करेल. तसेच, फडणवीस यांना आता दुसरं काही काम आहे का? ते बिचारे आता असं करणारचं, असा टोला राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांची बैठक पार पडल्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते.

आता आमची जी बैठक होती ती जीएसटी आणि राज्याचे स्त्रोत कसे वाढवायचे यासंदर्भात होती. खातेवाटप जाहीर करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, मुख्यमंत्री ते लवकरच जाहीर करतील, असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.

तत्पूर्वी जनतेने आम्हाला जनमत दिलं होतं, परंतु शिवसेनेने बेईमानी केली अशी टीका माजी मुख्यमंंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं असाही टोला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी लगावला. एवढंच नाही तर ठाकरे सरकारवरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीची घोषणा देणार होती परंतु ते आश्वासन ठाकरे सरकारनं पाळलं नाही अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पालघर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारवर त्यांनी यावेळी जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘जनतेनं युतीला जनमत दिलं होतं, परंतु शिवसेनेनं बेईमानी केली. सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का?, असा सवाल फडणवीस यांनी केला. ‘वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं,’ असंही ते म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर घणाघाती टीका केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, सातबारा कोरा करू अशी आश्वासने जनतेला देण्यात आली होती. परंतु त्यातील कशाचीही पूर्तता झालेली नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ जनादेशाशीच नव्हे तर जनतेशीही प्रतारणा केली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

Web Title:  Minister Jayant Patil answer to opposition leader Devendra Fadnavis over govt remarks.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x