22 February 2025 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

‘एक आहे पण नेक आहे’ | पक्षांतराने अजिबात विचलित होऊ नका

MNS Bala Nandgaonkar, MNS MLA Raju Patil, Raj Thackeray

डोंबिवली, ०३ फेब्रुवारी: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला दोन मोठे धक्के बसले. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मनसे प्रमुख राज ठाकरेंना मोठे धक्के बसल्याची चर्चा झाली. अशा सगळ्या परिस्थितीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील काहीसे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि त्या प्रवेशांना विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. कोणत्याही संघटनेतून कोणीही गेले तरी संघटना ही कायम कार्यरतच असते. आपल्या पक्षाने या आधीही अनेक मोठ-मोठी पक्षांतरं अनुभवली आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर कायमच श्रद्धा ठेवून कार्यरत असतो”, असं बाळा नांदगावकर यांनी फएसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच स्थानिक आमदार राजू पाटील व त्यांचे सहकारी हे सुद्धा कल्याण डोंबिवली मध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत असतांना काही जण पक्ष सोडून गेले. परंतु यात निराश होण्याचे काही कारण नाही, तसेच जनता सगळे जाणून आहे व आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे या गोष्टींना अवास्तव महत्त्व न देता येणाऱ्या निवडणुकीची कसून तयार करावी. राजू पाटील हे आपले एकमेव आमदार आहेत, लोक अनेकदा म्हणतात की एकच आहे एकच आहे, पण आमचा एक आहे पण “नेक” आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील सर्वांना एकच विनंती की, अशा पक्षांतराने अजिबात विचलित होण्याचे कारण नाही. राजू पाटील यांच्या नेतृत्वात आपण कल्याण डोंबिवलीत मोठे यश मिळविणार हे नक्की असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.

 

News English Summary: Since time immemorial, some people from Dombivli have left the party and joined another party, and it has been reported that those entries have been repeatedly shown through various media. No matter who leaves the organisation, the organization is always working. Our party has already experienced many major defections. But one thing is for sure, no matter who goes, our Maharashtra soldier always works with faith in the princes, Bala Nandgaonkar said in a Facebook post.

News English Title: MNS Bala Nandgaonkar support for MLA Raju Patil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x