वाद उफाळला! मी तोंड उघडलं तर हा नवी मुंबईत तोंड लपवत फिरला असता: अविनाश जाधव
नवी मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या ठाणे आणि नवी मुंबईतील पक्षांतर्गत घडामोडींमुळे वाद उफाळून आल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे मनसेत महत्वाची जवाबदारी असणारे नेतेच थेट खुलेआम समाज माध्यमांवर संताप व्यक्त करत असल्याने त्यांना कोणत्याही परिणामांची देखील चिंता नसावी असंच सगळं चित्र आहे. या राजकारणाला सुरुवात अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या नवी मुंबईतील थाळीनाद मोर्चापूर्वीच झाली होती, ज्यापासून वरिष्ठ पातळीवरील काही पदाधिकारी वगळता सामान्य कार्यकर्ते अंधारात होते असंच म्हणावं लागेल.
काही दिवसांपूर्वी, एका बाजूला राज्याच्या राजकारणात सत्ता स्थापनेवरून जोरदार घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे कार्यकर्त्यांसोबत थाळीनाद नवी मुंबईतील मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या मोर्चातील प्रत्यक्ष सहभागाने त्यांनी पूर्णवेळ कार्यरत होण्याचा निर्णय घेतला असावा असं म्हटलं गेलं. नवी मुंबईतील ६५०० कामगारांचे १४ महिन्यांचे वेतन महापालिकेकडे थकीत आहेत ते पैसे कामगारांना मिळवून देण्यासाठी अमित ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत निद्रिस्त प्रशासनाला जागं करण्यासाठी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला होता.
दरम्यान, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली नवी मुंबईत महापालिका कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थाळीनाद आंदोलन केलं. पालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा अशा १७ विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांना त्यांची १४ महिन्यांची थकबाकी (एकूण ९० कोटी रुपये) तसंच घंटागाडी कामगारांना त्यांची संपूर्ण ४३ महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
एकाबाजूला अमित ठाकरे यांच्या मोर्चातील प्रत्यक्ष सहभागातून होकारात्मक चित्र असताना, नवी मुंबई आणि बेलापूर’मधील पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकं काय बिनसलं ते अजून पूर्णपणे स्पष्ट झालं नव्हतं. कारण अमित ठाकरे यांचा मोर्चातील सहभाग आधीच निश्चित झालेला असताना, त्याआधी दोन दिवसांपासून नवी मुंबई आणि बेलापूर परिसरातील अनेक विभागध्यक्षांनी एकामागे एक असे राजीनामा सत्र सुरु केलं आणि त्याचा स्वतःच समाज माध्यमांवर खुलेआम प्रचार सुरु केला होता.
पक्षाचं नैतृत्व करणाऱ्या राज ठाकरे यांचे चिरंजीव नवी मुंबईत मोर्चमधे सहभाग घेण्यासाठी येणार असल्याचं माहित असताना हे हेतुपुरस्कर कोणीतरी हे राजीनामा सत्र घडवून आणलं याची चर्चा रंगली होती, जेणेकरून मोर्चा असफल व्हावा अशाच त्या अंतर्गत घडामोडी होत्या. मात्र तरीदेखील गजानन काळे यांनी मोर्चा सर्वशक्तीनिशी यशस्वी केला आणि त्याची प्रसार माध्यमांमध्ये चर्चा देखील रंगली होती. मात्र त्यानंतर पुन्हा मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष यांची राजकीय कोंडी करण्यास वरच्या पातळीवरून सुरुवात झाल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरु झाली. त्याचाच प्रत्यय तेव्हा आला जेव्हा मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी तडकाफडकी पक्षपदाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे दिला. मात्र त्यांनी तो समाज माध्यमांवर देखील शेअर करत विषयाची इतरांना देखील सार्वजनिकरित्या कल्पना करून दिली.
अखेर मनसेतील अंतर्गत संघर्षानंतर नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचा थेट आरोप त्यांनी पत्रात केला असल्याचं समोर आलं.
राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात गजानन काळे यांनी म्हटलंय की, सलग २-३ निवडणुका न लढताही नवी मुंबई विधानसभेत यंदाच्या निवडणुकीत ५० हजार लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखविला. मागील पाच वर्षात पक्षाची मजबूत बांधणी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र अमित ठाकरेंच्या मोर्च्याला यश येऊ नये त्याच्या एक दिवस अगोदर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला अन् राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष आणि नेते अभिजीत पानसे यांनी लक्ष घातल्यानंतरच गटातटाच्या राजकारणाला खतपाणी मिळाले असा थेट आरोप त्यांनी केला.
तसेच या संपूर्ण घटनेसाठी अविनाश जाधव यांनी मला दोषी ठरवले. दुसरी बाजू ऐकून घेण्याची तसदी नेते म्हणून घेतली नाही. या सगळ्या प्रकारामुळे मी व्यथित झालो असून अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात काम करणे अशक्य आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देतोय. मात्र महाराष्ट्रसैनिक म्हणून पक्षाचं काम करण्याचा माझा निर्णय आहे. आपल्या नेतृत्वावर कायम विश्वास व प्रेम केले. म्हणून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार मनात नाही. ते मी करणार नाही असा विश्वास गजानन काळे यांनी पक्षाला दिला होता.
दरम्यान, नवी मुंबईसहित ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना मनसेत टोकाचे आरोप करत फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या नवी मुंबईत गणेश नाईक पुन्हा स्वगृही परतण्यासाठी चाचपणी करत आहेत आणि त्यात शिवसेना देखील नवी मुंबईत हातपाय पसरविण्याच्या जोरदार तयारीला लागली आहे. गजानन काळे यांनी मनसे पक्ष सोडला नव्हता, मात्र राजकीय वादाचं स्वरूप मोठं असल्याचं लक्षात येताच आणि संबंधित वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच गजानन काळे यांना कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी बोलाविण्यात आले. अखेर राज ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीनंतर गजानन काळे यांना पुन्हा तेच पद बहाल करत पक्ष कार्याची जवाबदारी देण्यात आली आणि गजानन काळे यांच्याबाजूने वाद मिटला तरी दुसऱ्या बाजूला ते अविनाश जाधव यांना पसंत आलं नसल्याचं दिसत आहे. कारण, गजानन काळे यांनी समाज माध्यमांवर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सर्वकाही ठीक असल्याचं सांगत मी पुन्हा त्याच जोमाने नवी मुंबईत कामाला लागणार असल्याचं स्पष्ट केलं आणि वादावर पडदा टाकला. मात्र काही वेळातच ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पुन्हा गजानन काळे यांना लक्ष करत एक पोस्ट टाकत स्वतःचा संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरेंच्या प्रेमापोटी आणि दैवत असे शब्दप्रयोग करून दोन्ही नेते त्याच पक्ष नैत्रुत्वाच्या मनसेचे खुलेआम समाज माध्यमांवर वाभाडे काढून पक्ष कार्यकर्त्यांना देखील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वेठीस धरत आहेत. परिणामी, मनसेचे कार्यकर्त्यांकडूनच त्या पोस्टवर आरोप-प्रत्यारोप सुरु करत एक आगळं वेगळं पक्षप्रेम दाखविण्यास सुरुवात झाली आहे आणि विशेष म्हणजे त्यात थेट हफ्तेखोरीच्या कमेंट्स एकमेकांवर देण्यात येत आहेत. त्यामुळे, स्थानिक नैतृत्वाने समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमुळे कार्यकर्तेच एकमेकांना भिडल्याच चित्र आहे. गजानन काळे यांच्या ते ध्यानात आल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
मात्र अविनाश जाधव यांनी अजून ते टाळलेलं आहे. तसेच मनसे चित्रपट सेनेने आयोजित केलेल्या क्रिकेट सामान्यांना देखील गजानन काळे, अभिजित पानसे आणि स्वतः आमदार राजू पाटील यांच्यासहित सर्व नेते पदाधिकारी हजर होते, मात्र अविनाश जाधव यांची त्याला अनुपस्थिती स्पष्ट जाणवत होती आणि त्याचं खरं कारण समोर नसलं तरी त्यांच्या मनातील धुसपूस आणि गजानन काळे यांची उपस्थिती हेच तर कारण नव्हतं ना अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.
Web Title: MNS laeder from Thane Avinash Jadhav Not Happy With Latest Political Movement From MNS Navi Mumbai
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे