5 November 2024 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

कोरोना रुग्णांच्या मदतीला धावणाऱ्या अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस

MNS Leader Avinash Jadhav, Tadipar Notice, Vasai Virar Municipal corporation

ठाणे, ३१ जुलै : यापूर्वी मोदींच्या कारभारावर हिटलरशाहीचा आरोप करणाऱ्या ठाकरेंचा कारभार सुद्धा त्याच हिटलरशाहीच्या दिशेने जाताना दिसत आहे. कारण कोरोना आपत्तीत सुद्धा प्रशासनातील उन्मत्त अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाकडे काणाडोळा करत सामान्य रुग्णांचे प्रश्न मांडणाऱ्या विरोधकांना तडीपारीची नोटीस पाठविण्याचं शौर्य ठाकरे सरकार दाखवत आहे असंच म्हणावं लागेल.

कारण मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तब्बल दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुकला व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वसई पालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलन प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना खुलासा करण्यासाठी ४ ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.

याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मागची अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय, स्वत:साठी आंदोलन केले नाही, आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना त्यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यासं सांगितलं आहे. जिल्ह्यात इतके गुंड आहेत त्यांना अशी नोटीस कधी बजावली नाही, लोकांसाठी आंदोलन करताना अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे असा आरोप त्यांनी केला.

विशेष म्हणजे वसई पालिका आयुक्तांवर कर्मचारी महिलेने याआधी गंभीर आरोप केले होते. याच आयुक्तांचा जुना वाद न्यायालयात देखील गेला होता आणि त्यांना न्यायालयाने देखील झाडले होते. विशेष म्हणजे वसई पालिका आयुक्तांवर महिला कर्मचारी महिलेने याआधी नेमके काय गंभीर आरोप केले होते.

 

News English Summary: MNS Thane city district president Avinash Jadhav has been issued a notice to be deported for two years. Avinash Jadhav has been issued deportation notices from five districts namely Mumbai, Thane, Thane Rural, Navi Mumbai and Raigad.

News English Title: MNS Leader Avinash Jadhav Tadipar Notice Thane Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AvinashJadhav(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x