अविनाश जाधव म्हणालेले 'मी तोंड उघडलं तर हा तोंड लपवत फिरला असता' | आज पत्नीच्या एका आरोपात साम्य?
मुंबई, १३ ऑगस्ट | सध्या मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांचावर त्यांच्या पत्नीने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यात एक आरोप हा नवी मुंबई मनपातील वसुलीवरून देखील आहे. मात्र आता त्या आरोपांना अनुसरून साधारण दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई आणि ठाणे मनसेतील अंतर्गत वादातून घडलेली घटना समोर येतं आहे. मनसेतील तो अंतर्गत वाद त्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या आणि राज ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतर निवळला होता, परंतु काही फूटप्रिंट अविनाश जाधव यांच्या वक्तव्यातून राहून गेल्याच म्हणता येईल.
कारण साधारण दोन वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये मनसेतील अंतर्गत चव्हाट्यावर आली होती. त्यावेळी मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि नेते अभिजीत पानसे यांच्या मनमानीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि नेते अभिजीत पानसे यांनी लक्ष घातल्यानंतरच गटातटाच्या राजकारणाला खतपाणी मिळाले असा थेट आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर ‘कृष्णकुंज’वर काळे आणि जाधव यांचे समर्थक आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं.
आदरणीय राजसाहेब, सदैव तुमच्यासोबत.
आजपासून मी ‘लाखोंमधला एक’ महाराष्ट्र सैनिक! pic.twitter.com/q5IXMXlVVH— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) December 13, 2019
अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचा स्पष्ट आरोप गजानन काळे यांनी ट्विटरवरुन जाहीरपणे केला होता. गजानन काळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील आणि गजाजन काळे यांच्यासोबत राज ठाकरेंनी बैठक घेतली होती. यावेळी ‘कृष्णकुंज’वर गजानन काळे आणि अविनाश जाधव यांचे समर्थक एकमेकांना भिडले होते.
तसेच या संपूर्ण घटनेसाठी अविनाश जाधव यांनी मला दोषी ठरवले होते. दुसरी बाजू ऐकून घेण्याची तसदी नेते म्हणून घेतली नाही. या सगळ्या प्रकारामुळे मी व्यथित झालो असून अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात काम करणे अशक्य आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देतोय. मात्र महाराष्ट्रसैनिक म्हणून पक्षाचं काम करण्याचा माझा निर्णय आहे. आपल्या नेतृत्वावर कायम विश्वास व प्रेम केले. म्हणून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार मनात नाही. ते मी करणार नाही असा विश्वास गजानन काळे यांनी पक्षाला दिला होता.
त्यानंतर गजानन काळे यांनी समाज माध्यमांवर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सर्वकाही ठीक असल्याचं सांगत मी पुन्हा त्याच जोमाने नवी मुंबईत कामाला लागणार असल्याचं स्पष्ट केलं आणि वादावर पडदा टाकला होता मात्र काही वेळातच ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पुन्हा गजानन काळे यांना लक्ष करत एक पोस्ट टाकत स्वतःचा संताप व्यक्त केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “मी तोंड उघडलं तर हा नवी मुंबईत तोंड लपवत फिरला असता, तू काय धंदे करतोस ते सर्व माहिती असल्याचं” असं बरंच काही म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते समाज माध्यमांवर एकमेकांवर हफ्तेखोरी आणि वसुलीवरून आरोप प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळालं. नंतर राज ठाकरेंच्या बैठकीनंतर वाद निवळल्यानंतर अविनाश जाधव यांनी संबधित फेसबुक पोस्ट डिलीट केली होती.
मात्र, आता गजानन काळे यांच्या पत्नीने त्याच्यावर व्यक्तिगत पातळीवरील केलेल्या आरोपांना वगळून एक आरोप हा गजानन काळेंच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित म्हणजे नवी मुंबईतील अधिकारी आणि कंत्राटदारांकडून वसुली संदर्भातील केला आहे हे विशेष म्हणावे लागेल. मात्र यासर्व वादात नवी मुंबई महापालिकेतील निवडणूक मात्र मनसेसाठी कठीण झाली आहे हे मात्र नक्की झालं आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MNS Leader Gajanan Kale VS her wife allegations news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार