17 April 2025 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

कल्याण आणि शीळ फाट्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मनसेच्या आमदारचा पुढाकार - सविस्तर

 MNS MLA Pramod alias Raju ratan Patil, raj thackeray mns kalyan, kalyan shil phata

कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू)पाटील, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे,एमएमआरडीए,एमएसारडीसी आणि टीएमसी अधिकाऱ्यांनी केला एकत्रित पाहणी दौरा.

कल्याण ग्रामीण: गेल्या काही वर्षांपासून शिळफाटा, कल्याण फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याचा फटका कल्याण, डोंबिवली,
कल्याण ग्रामीण, पनवेल, नवीमुंबई, मुंब्रा आणि ठाण्या मधील प्रवाशांना पडतो. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल या करता मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पुढाकाराने वाहतूक पोलीस, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष वाहतूक कोंडीची पाहणी करत दौरा केला. यावेळी शीळफाटा, कल्याणफाटा परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून महिन्याभरात हा प्रश्न सोडविण्यात येईल असे ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपयुक्त अमित काळे यांनी सांगितले.

कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि दिवा परिसरातील प्रवाशांना सकाळच्या वेळेस मुबंंई, नवी मुंबई, ठाणे, पनवेलच्या दिशेने जात असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पुढाकाराने वाहतूक पोलीस, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष वाहतूक कोंडीची पाहणी करत दौरा केला.यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिळफाटा जक्शन येथे उड्डाणपूलाचा प्रस्ताव एमएमआरडीए कडे दिला.

रस्त्याच्या कडेला झालेल्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे टीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे. तसेच कल्याणफाटा ते म्हापेकडे जाण्याऱ्या पर्यायी (टेकडीवरील रस्ता) रस्त्यावर खड्डे पडले असल्याने शनिवार ते मंगळवार या दिवसात संपूर्णपने खड्डे बुजवून रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याने त्यासाठी येत्या शनिवार पासून मंगळवरपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे या पाहणी दौऱ्यावेळी सांगितले.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म उपयोजना केल्या जाणार आहेत असे ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. लॉंग टर्म मध्ये उड्डाणपूल बनवणे, अंडरपास तयार करणे आणि रोड मोठे करणे या उपाययोजना केल्या जातील आणि त्याचे काम एमएमआरडीए करेल. तसेच
शॉर्ट टर्म मध्ये जंक्शन मोठे करणे, काही ठिकाणी बॅरीगेट उभारणे, लेफ्ट फ्री करणे, काही ठिकाणी डीवायडर बंद करणे आणि तसेच मध्यस्थानी असलेले पोल काढणे ही कामे केली जातील. त्यामुळे महिन्याभरात वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होईल असेही पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

यावेळी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाने, मोहन पाटील, एमएमआरडीएचे इंजिनिअर प्रशांत चाचरकर, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंभाते, ठाणे महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम अभियंता रामदास शिंदे, केडीएमसी मनसे गटनेते मंदार हळबे, मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, राहुल कामत, कल्याण ग्रामीण विधानसभा मनोज घरत, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष म्हात्रे, बाबुराव मुंढे, शाखा अध्यक्ष शरद पाटील उपस्थित होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)#RajuPatil(24)MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या