वाढीव वीजबिल | मनसेचा महामोर्चा | ठाण्यात उद्धव ठाकरे हाय-हाय घोषणाबाजी
मुंबई, २६ नोव्हेंबर: वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली (MNS party Protest against High Electricity Bills) असून आज (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला आहे.
सर्वसामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. अनेक शहरांत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. वीज दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश महामोर्चाचं आयोजन (Maharashtra Navnirman Sena Jan Akrosh Morcha) केलंय. यासाठी मुंबईच्या विविध भागांतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, ठाण्यात अविनाश जाधव यांच्या नैत्रुत्वात हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी पोलीस आणि महाराष्ट्र सैनिकांदरम्यान झटापट देखील झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याआधीच पोलिसांनी मोर्चा रोखला आणि वादावादी सुरु झाली. त्यावेळी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन गाडीत बसवले, मात्र यावेळी संतापलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ‘उद्धव ठाकरे हाय-हाय’ अशी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
News English Summary: Thousands of activists marched in Thane under the leadership of Avinash Jadhav. There was also a scuffle between the police and Maharashtra soldiers. Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck. At that time, the police arrested the office bearers and put them in the car, but this time the angry office bearers and activists were seen shouting ‘Uddhav Thackeray hay-Hay’ against Chief Minister Uddhav Thackeray.
News English Title: MNS Thane Protest against high electricity bills in leadership of Avinash Jadhav news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा