15 January 2025 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
x

स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी मुलीने टेरेसवरून उडी मारली

नालासोपारा : नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, पत्ता विचारण्याचे निम्मित करून छेडछाड करणाऱ्या नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी त्या मुलीने थेट टेरेसवरूनच खाली उडी मारली.

ती मुलगी अल्पवयीन असून तीच वय १२ वर्ष आहे. नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी त्या अल्पवयीन मुलीने थेट टेरेसवरूनच खाली उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्या कंबरेचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे समजते. उपचारांसाठी तिला ताबडतोब मुंबईतील नायर रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नालासोपारा परिसरात भीतीचं वातावरण आहे. मुळात ३ एप्रिल रोजी घडलेली घटना कॅमेरात कैद झाली आहे. तो नराधम ३५ वर्षीय असून त्याने मुलीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ गेला आणि त्या मुलीने पत्ता सांगितल्यावर तो तिला जबरदस्तीने टेरेसवर घेऊन जायला लागला आणि तिच्या सोबत अश्लील चाळे करू लागला. त्यामुळेच छेडछाड करणाऱ्या नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी त्या अल्पवयीन मुलीने थेट टेरेसवरूनच खाली उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. तो नराधम पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x