21 November 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA
x

हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीच्या आरोपांनंतर गजानन काळे फरार | नवी मुंबई पोलिस पथकांकडून शोध सुरु

Raj Thackeray

नवी मुंबई, १७ ऑगस्ट | नवी मुंबई सारख्या महत्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. कारण घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली आहे.

संजीवनी काळे आणि त्यांच्या परिवाराने मंगळवारी रामदास आठवले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते. विशेष म्हणजे मागील ६ दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत. गजानन काळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी व्यक्त केला.

गुन्हा दाखल झाल्यापासून गजानन काळे यांचा मोबाईल फोन स्वीच ऑफ आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही संजीवनी काळे यांना पाठिंबा दर्शविला होता. नवी मुंबईतील नागरिकांनीही संजीवनी काळे यांना पाठिंबा दिला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Navi Mumbai Police searching for MNS leader Gajanan Kale news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x