महत्वाच्या बातम्या
-
बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भातील दिशा कायदा आंध्र प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा पारित करा: आ. राजू पाटील
आंध्र प्रदेश विधानसभेचे शुक्रवारी ‘दिशा विधेयक’ पारित केलं. बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे केली जाणार आहे. बलात्काऱ्यांना फाशी देणारं आंध्र प्रदेश हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे. महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून नंतर तिचा मृतदेह जाळण्याची घटना काही दिवसांपूर्वी हैदराबादेत घडली आणि या घटनेचे देशभर पडसाद उमटले. यानंतर आंध्र प्रदेशने या कायद्यासाठी वेगाने पावले उचलली.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई: अविनाश जाधव यांच्यावर आरोप करत गजानन काळेंचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा
एका बाजूला राज्याच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे कार्यकर्त्यांसोबत थाळीनाद नवी मुंबईतील मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या मोर्चातील प्रत्यक्ष सहभागाने त्यांनी पूर्णवेळ कार्यरत होण्याचा निर्णय घेतला असावा असं म्हटलं गेलं. नवी मुंबईतील ६५०० कामगारांचे १४ महिन्यांचे वेतन महापालिकेकडे थकीत आहेत ते पैसे कामगारांना मिळवून देण्यासाठी अमित ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत निद्रिस्त प्रशासनाला जागं करण्यासाठी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
ना खाऊंगा ना खाणे दूंगा! लाचखोर भाजप नगरसेविकेला कोर्टाकडून ५ वर्षांचा कारावास
मीरा भाईंदर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली हिला लाच प्रकरणी ठाणे कोर्टाने ५ वर्ष कैद आणि ५ लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली लाचप्रकारणी ५ वर्षांचा कारावास आणि ५ लाख दंड अशी शिक्षा असून दंड न भरल्यास आणखी ६ महिन्याचा कारावास भोगावा लागेल.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण आणि शीळ फाट्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मनसेच्या आमदारचा पुढाकार - सविस्तर
कल्याण ग्रामीण: गेल्या काही वर्षांपासून शिळफाटा, कल्याण फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याचा फटका कल्याण, डोंबिवली,
5 वर्षांपूर्वी
कल्याण ग्रामीण, पनवेल, नवीमुंबई, मुंब्रा आणि ठाण्या मधील प्रवाशांना पडतो. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल या करता मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पुढाकाराने वाहतूक पोलीस, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष वाहतूक कोंडीची पाहणी करत दौरा केला. यावेळी शीळफाटा, कल्याणफाटा परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून महिन्याभरात हा प्रश्न सोडविण्यात येईल असे ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपयुक्त अमित काळे यांनी सांगितले. -
भिवंडी महापालिकेत काँग्रेसला बाजूला करत 'कोणार्क विकास आघाडीचा' महापौर
परस्परविरोधी विचारांची शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आल्याच्या धक्क्यातून जनता सावरत असतानाच भिवंडी महापालिकेत आणखी एक राजकीय चमत्कार घडला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव करून अवघ्या ४ नगरसेवकांच्या कोणार्क विकास आघाडीनं भिवंडीचं महापौरपद पटकावलं आहे. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्यानं ही उलथापालथ झाली आहे. ‘कोणार्क’च्या प्रतिभा पाटील निवडून आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
टोल फ्री ठाण्यासाठी मनसेचं आंदोलन; उद्धव 'ठाकरे' सरकारवर दबाव वाढणार
मागील काही वर्षांपूर्वी टोलमुक्त महाराष्ट्रसाठी आक्रमक आंदोलनं करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे टोलमुक्त (Toll Freee) आंदोलनाची सुरुवात मुळात मनसेनेच केली होती आणि त्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर ७० पेक्षा अधिक टोलनाके बंद देखील झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरे यांचा नवी मुंबई महापालिकेवरील थाळीनाद मोर्चात प्रत्यक्ष सहभाग
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी आज, गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ घेणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी'मार्गे मनसेचे राजू पाटील देखील मंत्रिमंडळात जाण्याची शक्यता? सविस्तर वृत्त
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची जवळीक पाहायला मिळाली होती. केवळ राज्यातील नव्हे तर देशातील सर्व विरोधकांना भाजप म्हणजे मोदी-शहा यांच्या हिटलरशाही विरुद्ध एकत्र येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं. प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने ऐतिहासिक निर्णय घेतला आणि थेट मोदी-शहांशी राष्ट्रीय पंगा घेत एनडीए’मधून बाहेर पडले. विशेष म्हणजे एकूण घडामोडींबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीवर कोणतीही टीका केली नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
पालघरमध्ये शेतकऱ्यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन जनसुनावणी उधळून लावली
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात पालघरमध्ये आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी शेतकऱ्यांनी उधळून लावली. पालघर पंचायत समितीमध्ये उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘बुलेट ट्रेन’च्या संदर्भात सुनावणी लावण्यात आली होती. या सुनावणीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद होता. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं लेखी निवेदन न देता सुनावणी लावण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी ही सुनावणी उधळून लावली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी मुंबईपासून जवळपास १४० किलोमीटर दूर पालघर जिल्ह्यामध्ये २८८ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र, या निर्णयाला भूमिधारक शेतकऱ्यांचा विरोध आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचं ठाण्यातील आनंदनगर येथील टोलनाक्यावर टोलमुक्तीसाठी आंदोलन
मागील काही वर्षांपूर्वी टोलमुक्त महाराष्ट्रसाठी आक्रमक आंदोलनं करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे टोलमुक्त आंदोलनाची सुरुवात मुळात मनसेनेच केली होती आणि त्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर ७० पेक्षा अधिक टोलनाके बंद देखील झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
मनसे इफेक्ट! कोपर रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाला मंजुरी; १८ला निविदा प्रसिद्ध होणार
एका बाजूला राज्यातील सत्तास्थापनेचा गोंधळ तब्बल ३ आठवडे सलग सुरु असताना, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या बाबतीत मात्र एक अपवादात्मक प्रकार पाहायला मिळत होते. एका बाजूला अपक्षांपासून एक-एक आमदाराच्या समर्थनाचा भाव वाढलेला असताना मनसे आमदार राजू पाटील यासर्व राजकीय बाजाराकडे दुर्लक्ष करत जोरदारपणे कल्याण-डोंबिवली शहरातील मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच पातळीवरील प्रशासकीय पाठपुरावा करू लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मनसे आ. राजू पाटील कल्याण-डोंबिवलीच्या प्रलंबित प्रश्नांवर युद्धपातळीवर कामाला लागले
एका बाजूला राज्यातील सत्तास्थापनेचा गोंधळ तब्बल दोन आठवडे सलग सुरु असताना, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या बाबतीत मात्र एक अपवादात्मक प्रकार पाहायला मिळत आहे. आज अपक्षांपासून एक-एक आमदाराच्या समर्थनाचा भाव वाढलेला असताना मनसे आमदार राजू पाटील यासर्व राजकीय बाजाराकडे दुर्लक्ष करत जोरदारपणे कल्याण-डोंबिवली शहरातील मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच पातळीवरील प्रशासकीय पाठपुरावा करू लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कल्याणमधील २७ गावांसंदर्भात मनसेचे आ. राजू पाटील यांची महापालिका आयुक्तांसोबत बैठक
आधी महापालिका नको आणि आता जिल्हा परिषद नको अशी भूमिका घेणाऱ्या कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांचा तत्कालीन महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा महापालिकेत समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रस्तावास मान्यता दिली होती, आणि त्याच आठवडय़ात अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
आगरी समाज प्रतिष्ठानसोबत मनसेचे आ. राजू पाटील टोरेंट पॉवर कंपनी विरोधात आक्रमक
महाराष्ट्रात अजून सत्तेत कोण विराजमान होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित झालं नसलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामान्य लोकांच्या आंदोलनात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी काल आगरी समाज प्रतिष्ठानने टोरेंट पॉवर कंपनीविरोधात आयोजित केलेल्या भव्य मोर्चात सहभाग नोंदवला.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजयी
मनसेच्या हाती सकाळपासून निराशा आल्याचं चित्र असताना अखेरच्या क्षणी मनसेचा एक उमेदवार जिंकल्याचं वृत्त आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू रतन पाटील यांनी एकूण ८६,२३३ मतं घेत शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी मनसेने मोठ्या प्रमाणावर मतं घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवलीतुन मनसेचे मंदार हळबे आणि कल्याण ग्रामीण'मधून राजू पाटील आघाडीवर
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
वसई, नालासोपारा, बोईसरच्या जागांवर फक्त ईव्हीएम घोटाळा आम्हाला हरवू शकतो: हितेंद्र ठाकूर
बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा आणि वसई-विरार मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भविष्यात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. मात्र, आपण राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. संघटनात्मक पातळीवरील राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या राजकारणाने पातळी सोडली. दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली. ही घटनाच दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे, अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत खेद व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
भविष्यात निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूर यांची घोषणा
बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा आणि वसई-विरार मतदारसंघाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भविष्यात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. मात्र, आपण राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. संघटनात्मक पातळीवरील राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या राजकारणाने पातळी सोडली. दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली. ही घटनाच दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे, अशा शब्दात हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकारपरिषदेत खेद व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
जात-धर्म पाहून मतदान करू नका; तुमच्यासाठी काम करणाऱ्याला निवडून द्या: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाणे शहरात जंगी सभा पार पडली. ठाण्यात मनसेने अविनाश जाधव, संदीप पाचंगे आणि महेश कदम आणि महेश सुतार यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांना हात घातला तसेच जात आणि धर्म पाहून मतदान करू नका असं आवाहन देखील ठाण्यातील मतदाराला केलं.
5 वर्षांपूर्वी -
बोलावं रे त्यांना स्टेजवर; महिलांच्या खात्यातील २ कोटी २५ लाख लंपास करणाऱ्यांची पोलखोल होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचाराला सुरुवात केल्यापासून अनेकांना अपेक्षा आहे ती राज ठाकरे यांच्या जाहीरपणे एखाद्याची पोलखोल करण्याची. काही टीव्ही वृत्त वाहिन्यांना देखील त्यांनी तसे संकेत दिले आहेत. लाव रे व्हिडिओ होणार किंवा नाही याचं सांगता येत नसलं तरी, ठाणे शहरात ‘बोलाव रे त्यांना स्टेजवर’ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50