महत्वाच्या बातम्या
-
महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या ५०० प्रवाशांना वाचवण्यात यश
महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या मदतीला नौदल, हवाईदल देखील कार्यरत करण्यात आलं होतं. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी येथे अडकली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रुळावर साठलं आहे. एक्सप्रेसमध्ये ७०० प्रवासी अडकले होते. यापैकी ५०० प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO : महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ अडकली, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी
मुसळधार पावसामुळे बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचे ४१ लाख मतदारांना वाटत नाही: सुजात आंबेडकर
भारिप बहुजन पक्ष आणि एमआयएम’च्या आघाडीनंतर निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोप वरोधकांनी वारंवार केला आहे. इतकंच नाही समाज माध्यमांवर देखील तीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या एकूण प्रतिक्रिया पाहिल्यास त्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाला पोषक ठरतील अशाच असल्याची चर्चा देखील प्रसार माध्यमामध्ये पाहायला मिळते.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार, १३ नगरसेवक व अनेक पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर
जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पालघर: पुराचा धोका! मुंबई पालिकेने धोक्याचा सायरन वाजवला; पालघरवासीयांना ‘जागते रहो'
मुंबईकरांना पहिले काही दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने मुंबईमध्ये जरी थोडी उसंत घेतली असली तरी पावसाने आता मोर्चा मुंबई नजीकच्या शहरांकडे वळवल्याचे दिसत आहे. ठाणे, पालघर जिह्यातील तानसा आणि वैतरणा ही दोन्ही मुख्य धरणे ओसंडून वाहू लागली असून आता कधीही पुराचा धोका संभवतो असे सूतोवाच प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे नद्यांनी देखील धोक्याची पातळी गाठली असून कोणत्याही क्षणी पूर येऊन परिसरातील तब्बल ७५ गावांची घर देखील पाण्याखाली बुडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेकडून ठाण्यात ‘सीड बॉम्बचे’ वाटप
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना बॉंब वाटप करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सांगितल्याप्रमाणे ठाण्यात बॉंब’चे वाटप केले. तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणते बॉंब वाटप करणार याची उत्सुकता सर्वांना होती आणि अखेर महाराष्ट्र निर्माण सेनेकडून ठाण्यात सीड बॉम्बचे वाटप करण्यात केले.
6 वर्षांपूर्वी -
शहापूर राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा राष्ट्रवादीला रामराम..शिवबंधन बांधणार
ठाण्यातील एनसीपीचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवतील हे जवळपास नक्की झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नितेश राणेंचा सेनेला दणका; विद्यार्थ्यांच्या आडून १५० रु'चा हॅण्डवॉश १३०० रु खरेदी प्रस्ताव स्थगित
सत्ताधारी शिवसेना पक्ष सध्या स्थायी समितीच्या माध्यमातून टेंडरमध्ये नवनवे विक्रम करताना दिसत आहेत. महापालिकेच्या तिजोरीतून पैसे कसे उकळावे याबाबतीत ठाण्यातील गोल्डन गँगचा हात कोणीच पकडू शकत नाहीत. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पक्षासाठी फंडींगच्या अनुषंगाने टेंडरचा वापर केला जातो आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकांमध्ये असे प्रकार नित्याचे झाले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी ‘आपला दवाखाना’च्या अनुषंगाने आणि ठाण्यातील व्यवस्थेच्या नावाने देखील मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप याआधीच विरोधकांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई, ठाण्यावर भीषण पाणीसंकट; केवळ २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या जलाशयांमध्ये केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असून पाऊस झाला नाही, तर भीषण पाणीसंकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण जून महिना संपला तरी मुंबई आणि ठाण्यात पावसाचं आगमन झालेलं नसून, अजून देखील उन्हाच्या झळा पोहोचत असून उकडाच कायम आहे. परिणामी उरलेल्या पाण्याची बाष्पीभवनाने अजूनच घट होत आहे. ठाण्यात आधीच ३० टक्के पाणीकपात लागू असल्याने नागरिक या पाणीबाणीने चिंतित आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गॅंगस्टर सुरेश पुजारी'कडून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठार मारण्याची धमकी
कुख्यात गॅंगस्टर सुरेश पुजारी टोळीकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सदर प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून संदेश शेट्टी याला अटक केली, तर पुजारी टोळीतील इतर आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीच्या शेट्टी याला जाधव यांनी विनंती केली. तेव्हा, संबंधित प्रकरणात पडू नको अन्यथा ठार मारण्याच्या धमकीचा फोन पुजारीने परदेशातून केला होता असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा २०१९: आपल्या निधीसाठी ‘आपला दवाखाना’च्या नावाने १६० कोटींचा घोटाळा? सविस्तर
दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर शिवसेनेने ठाणे महापालिका हद्दीत ‘आपला दवाखाना’ नावाची संकल्पना सुरू करणार असून त्यासाठी सर्वप्रथम किसननगर आणि कळवा येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ही योजना पूर्णतः फोल ठरली आहे आणि लोकं तेथे फिरकत सुद्धा नाहीत अशी माहिती आहे, तसेच ठाणे शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तब्बल २६ आरोग्य केंद्रांची गरज असताना केवळ पक्षाच्या प्रचाराच्या हेतूने आणि आरोग्याच्या नावाखाली या संकल्पनेसाठी तब्बल १६० कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा दावा महापालिका विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे मेडिकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडला हा ठेका देऊन त्याद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पूर्वपदावर आलेली मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली
खडवलीजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाउन दोन्ही दिशेच्या गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज सकाळी ही बाब निदर्शनास आली.
6 वर्षांपूर्वी -
मनसे शेतकरी महामोर्चा! सरकारचा जीआर; शेतकऱ्यांनो शेतमाल आता थेट पालिका-नगरपालिका क्षेत्रात विका
मागील महिन्यात ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एका आंबे विक्रेत्या शेतकऱ्याचा स्टॉल स्थानिक भाजपने हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या समर्थनार्थ ठाण्यातील मनसे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नैतृत्वाखाली आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आणि स्थानिक भाजप नगरसेवकांपासून सर्वानाच चोप देण्यात आला. मात्र त्यानंतर विषय एवढ्यावरच न थांबता मनसेने अजून एक लोकशाही मार्गाने पवित्रा घेत १७ मे रोजी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना नगरपालिका तसेच पालिका हद्दीत थेट मालाची विक्री करता यावी यासाठी सरकारवर कायद्यात तरदूत करण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने शेतकरी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
6 वर्षांपूर्वी -
कल्याण: शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी; तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील पराभूत
कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे १ टर्म शिवसेनेकडून खासदारकी उपभोगणारे श्रीकांत शिंदे आता पुढील ५ वर्ष पुन्हा कल्याणचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
ठाणे लोकसभा: शिवसेनेचे राजन विचारे यांचा विजय; राष्ट्रवादीचे आनंद परांजपे पराभूत
ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे २ टर्म शिवसेनेकडून खासदारकी उपभोगणारे राजन विचारे आता पुढील ५ वर्ष पुन्हा ठाण्याचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
शुक्रवारी मनसेचा ठाण्यात शेतक-यांसाठी महामोर्चा, राज्यभरातून शेतकरी घेणार सहभाग
ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आंब्याच्या स्टॉलवरून मोठा राडा झाला होता. त्यात कोकणातील सामान्य शेतकऱ्याचा आंब्याचा स्टॉल हटवण्यासाठी आलेल्या भाजपच्या ठाणे जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवकाला चोप देण्यात आला होता. त्यात काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे महाराष्ट्रातील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी देखील सदर विषयाला अनुसरून प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जर फायदा थेट शेतकऱ्यांना होत असेल तर मुळात पक्षीय मतभेद येतातच कसे असा प्रतिप्रश्न उपस्थित करत भाजपच्या त्या विरोधाला प्रतिउत्तर दिलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना नगरसेवक गोरख जाधव यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल
स्वतःच्या विभागात काम सुरु ठेवण्यासाठी ठेकेदाराकडे टक्केवारीची मागणी केल्याच्या आरोपाखाली शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. गोरख जंगलीराम जाधव (२६) असे या त्या नगरसेवकाचे नाव असून, तो कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्टेशन नजीकच्या अटाळी गावात राहणारा आहे.
6 वर्षांपूर्वी -
ठाणे: भलं शेतकऱ्यांचं होतंय, मग यात पक्षीय राजकारण कसलं आणताय? राज ठाकरे
मागील काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भारतीय जनता पक्षालाच प्रतिप्रश्न केला आहे. कॅनडाचे नागरिक अक्षय कुमार यांनी पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला होता. आंबा कापून खायचा की चोखून खायचा? यावर आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा चिमटा यावेळी भाजपाला काढला आहे. ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा मतमोजणीच्या दिवशी मोबाईल टॉवर बंद करा अन्यथा जॅमर बसवा; मनसेची मागणी
व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. याची विरोधी पक्षांकडून प्रचंड नाराजी वर्तवली जात आहे. दरम्यान लोकसभा मतमोजणी प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने देखील सरसावली आहे. लोकसभा मत मोजणीच्या दिवशी ठाण्यातील मोबाईल टॉवर बंद ठेवावेत अन्यथा मतमोजणी केंद्रामध्ये जॅमर बसवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक आयोगाच्या जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अनधिकृत बांधकाम; शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक
एका स्थानिक घराची बेकायदा उंची वाढवण्याच्या कामाची तक्रार करु नये म्हणून तक्रारदाराकडे २५,००० रुपयांची मागणी स्थानिक शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर याने केली होती. अखेर 10 हजारांवर तडजोड झाली आणि ती रक्कम मध्यस्थामार्फत घेतल्याप्रकरणी त्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यस्थासकट अटक केली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो