महत्वाच्या बातम्या
-
मुंब्रा भागातील प्राईम क्रिटिकेयर या खाजगी हॉस्पिटलला आग | 4 रुग्णांचा मृत्यू
मुंब्रा शहरातील कौसा भागात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी पहाटे 3 वाजता भीषण आग लागली. या घटनेत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून 20 रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर आयसीयूतील 6 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असताना 4 रुग्णांचा मृत्यू झाला. यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वसईतील कोव्हीड सेंटरमध्ये सेंट्रलाइझ्ड एसीचा स्फोट | 13 रुग्णांचा मृत्यू - आ. हितेंद्र ठाकूर
पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एका कोरोना सेंटरला आग लागल्याने 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या कोरोना कंट्रोल रूमने याची पुष्टी लेली आहे. इतर रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या कोव्हीड सेंटरमध्ये एकूण 90 रुग्णांवर उपचार सुरु होते. आगीची ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजताच घडली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अंबानींच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याकडून सुपारी - अविनाश जाधव
सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी सायंकाळी जप्त केलेली मर्सिडीज कार धुळे पासिंगची असून ती मनीषा महेंद्र भावसार यांच्या नावावर असल्याचे दिसते आहे. दरम्यान, महेंद्र भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी ती विकत घेतली होती आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ती आॅनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विकली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान याच विषयात आता राजकीय नेत्यांचे धक्कादायक दावे देखील समोर येऊ लागले आहेत. तसाच एक धक्कादायक दावा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख यांचे शेवटचे लोकेशन वसई आणि मी वसईत राहतो या निष्कर्षाने आरोप म्हणजे...
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
4 वर्षांपूर्वी -
Maha Budget 2021-22 | ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी 7500 कोटी रुपये
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
4 वर्षांपूर्वी -
तपासाला वेग | ठाणे पोलिसांना मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस झालं
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ बंगल्यासमोरील स्फोटके प्रकरणातील स्काॅर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शनिवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. मात्र या अहवालात मृत्यू कसा झाला याचा उल्लेख नाही. मनसुख यांचा व्हिसेरा मुंबईतील रासायनिक प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे. इकडे, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा-रेतीबंदर या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
4 वर्षांपूर्वी -
हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगत आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या २७ गावांच्या विकासासाठी विशेष पॅकेज द्या | आ. राजू पाटील यांची अर्थमंत्र्यांकडे मागणी
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. 27 गावांसाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात यावी, अशी आग्रहाची विनंती आमदार राजू पाटलांनी बोलून दाखवली होती. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या दिवा शिळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी, अशीही मागणी यापूर्वी राजू पाटील यांनी अजित पवारांकडे केली होती.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवली | मनसे अध्यक्षांकडून पक्ष बांधणी | तिघांची प्रभारी म्हणून नियुक्ती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष बांधणीला आता सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंनी यांनी वैयक्तिक चर्चा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गळती रोखण्यासाठी माजी आमदार नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेकडो गुन्हे दाखल करा | पण बुलंद आवाज रयतेच्या न्याय हक्कांसाठी घुमणारच - मनसे
नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आज (शनिवार) वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
‘एक आहे पण नेक आहे’ | पक्षांतराने अजिबात विचलित होऊ नका
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला दोन मोठे धक्के बसले. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मनसे प्रमुख राज ठाकरेंना मोठे धक्के बसल्याची चर्चा झाली. अशा सगळ्या परिस्थितीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील काहीसे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कार्यकर्ता-पदाधिकारी फुटला तरी बातमी | याचा अर्थ त्या पक्षाच्या असण्याची सगळेच दखल घेतात
कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
4 वर्षांपूर्वी -
KDMC | मनसेला मोठं खिंडार | मंदार हळबे भाजपमध्ये | मनसेचा निवडणुक मार्ग खडतर
कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजेश कदम हे पदाधिकारी असताना देखील त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश देऊन राजेश कदम यांचं कल्याण डोंबिवलीत राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवली | मनसेचे महत्वाचे पदाधिकारी शिवसेनेत | शिंदे पिता-पुत्र कार्यरत
शिवसेनेने कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने, राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीत किती ताकद असू शकते, याचा अंदाज बांधता येईल. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर गणेश नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद भोवलं | KDMC मनसेत भूकंप | 320 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
राज्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेची चांगली ताकद आहे. तसेच याच महानगर पालिकेत मनसेचं कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क देखील जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार राजू पाटील यांची जनमानसात असलेली चांगली प्रतिमा देखील मनसेसाठी जमेची बाजू समजली जाते.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष ईडीच्या रडारवर | विवा ग्रुपवर ईडीची छापेमारी
सध्या महाविकास आघाडीतील नेते मंडळी ईडीच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळालं आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि त्यापूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीच्या फेऱ्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर ईडीचा मोर्चा भाजपाला राम राम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यावर तेही पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मीरा भाईंदर महापालिका | राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु
मीरा भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मीरा भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधीपक्ष नेते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा घड्याळ हाती बांधले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षातील नेते-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच पुनर्प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
अंबरनाथमधील काकोळी ग्रामपंचायतीवर मनसेचा भगवा | ७ पैकी ४ जागांवर विजय
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
युतीमुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर झाला | यावेळी वेगळं चित्र दिसेल - आशिष शेलार
ठाण्याच्या इतिहासात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमुळेच शिवसेनेचा महापौर आतापर्यंत झाला, परंतु, आता हे चित्र बदलेले सर्वांना दिसणार असून ठाण्यात भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे ठाणे प्रभारी आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50