महत्वाच्या बातम्या
-
लोटसचं ऑपरेशन सुरूच | भाजपचे ३ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी, माजी तसेच विद्यमान आमदारांनी भाजपाला रामराम करत महाविकास आघाडीतील पक्षात जाण्याचा सपाटा लावला आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
वगळलेली १८ गावं केडीएमसीतच राहणार | मुंबई हायकोर्ट | सेनेला निवडणूकपूर्व धक्का
कल्याण डोंबिवलीतील (Kalyan Dombivali Municipal Corporation) 27 गावांचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. परंतु, आता मुंबई हायकोर्टाने हा निर्णय रद्द करत राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. 27 पैकी वेगळी करण्यात आलेली 18 गावं ही कल्याण डोंबिवली पालिकेतच राहणार असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारकडून कोविड योध्यांना सर्वप्रथम लस | सेनेचे वाघ म्हणतात लोकप्रतिनिधींना अग्रक्रमाने द्या
संपूर्ण जग आज कोरोना लस केव्हा उपलब्ध होणार याची वाट पाहत आहे. दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. मात्र हे लॉबिंग करणाऱ्यांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (State health minister Rajesh Tope) यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार (First corona vaccine dose to doctors and Police) असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाढीव वीजबिल | मनसेचा महामोर्चा | ठाण्यात उद्धव ठाकरे हाय-हाय घोषणाबाजी
वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली (MNS party Protest against High Electricity Bills) असून आज (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीयो के सन्मान मे शिवसेना मैदान मे हे सरनाईकांचे नारे | ED'ची धाड पडताच मराठी माणूस?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने मंगळवारी सकाळी छापे मारले. यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ताब्यात घेत जवळपास सहा तास चौकशी केली. यानंतर ईडीने सरनाईकांना समन्स बजावले असून आज सकाळी 11 वाजता चौकशीला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी प्रकरण | आ. प्रताप सरनाईकांची होती मोठी भूमिका - सविस्तर वृत्त
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
तीन तिघाडी, काम बिघाडी असे निष्क्रिय आघाडी सरकार | भाजपचं वीजबिलांवरून आंदोलन
वाढीव वीज बिलाविरोधात भारतीय जनता पक्षाने कल्याणमध्ये आंदोलन केले. या दरम्यान, वीज बिलाची होळी करताना भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की, झटापट झाली. यावेळी आमदारांनी पोलिसांवर दपडशाहीचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पत्री पूल गर्डर लॉचिंग | अखेर आगामी KDMC महानगरपालिकेचा इव्हेन्ट पूर्ण
दोन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला गती आली आहे. तुळई बसविणे आणि अन्य कामे डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या पुलावसाठीची तुळई दोन दिवसांत ६० मीटरने पुढे ढकलण्याचे काम साडेसात तासांच्या मेगाब्लॉकमध्ये शनिवार आणि रविवारी करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पत्रीपूल | चीन जेवढ्या वेळेत हायवे आणि धरणं उभारतं | पण शिवसेना...
फेब्रुवारी २०२० पर्यंत कल्याणचा पत्रीपूल सुरू होणार, इतकंच नाही तर या पुलाच्या बाजूला आणखी एक नवा पूल उभारणार असल्याची पोश्टरबाजी शिवसेनेने २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत केली होती. म्हणजे कोरोनाची देशात कल्पनाही नसताना त्यापूर्वी पत्रीपूल पूर्ण होणार होता असं वचन शिवसेनेने दिलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली होती. पूल जीर्ण झाल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये हा पूल पाडण्यात आलेला.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे मनसे | एका बाजूला इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश | तर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर इतर पक्ष तसेच सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला जुने पदाधिकारी एकामागे एक असे राजीनामे देत अविनाश जाधव यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळ्याचं कारण देत आहेत. एखादा पदाधिकारी पक्ष सोडताना असे आरोप करत असेल तर संबंधित पदाधिकऱ्याचं राजकारण असू शकतं. मात्र यापूर्वी देखील राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी हेच एकमेव कारण पुढे करत असल्याने त्याचे दूरगामी परिणाम पक्षाला भोगावे लागू शकतात. शिवसेनेचं ठाण्यातील संघटन अत्यंत मजबूत असल्याने त्यांना काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी सोडून घेल्याने काहीच फरक पडणार नाही. मात्र ठाणे मनसेच्या बाबतीत फेसबुकवर तसं चित्र दिसत असलं तरी जमिनीवरील चित्र वेगळं आहे.
4 वर्षांपूर्वी -
वीज बिलात ना माफी ना सूट | शिवसैनिकांचं 'ते' चड्डी बनियन आंदोलन देखील वाया
महावितरणने अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जुलै महिन्यात महावितरणवर चड्डी बनियन मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे आमच्या अंगावर केवळ चड्डी बनियन उरलीय, तुमचे बील कुठून भरणार? असा सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला होता. राज्यात शिवसेना आघाडीची सत्ता असतानाही शिवसैनिकांनी हा सवाल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
ठाण्यात भाजपमध्ये गटबाजी वाढली | महत्वाच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा
निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान गटबाजीला कंटाळून भाजपच्या महत्वाच्या नेत्याने राजीनामा दिल्याने भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील गटबाजीला कंटाळून अखेर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे पदाधिकारी राकेश पाटील यांची हत्या इमारतीमध्ये ग्रिलचे काम घेण्याच्या वादातुन
उल्हासनगर शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षावर अंबरनाथ शहरात झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी सायंकाळी आणखी एका मनसे नेत्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. मनसे अंबरनाथ उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल घडली.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी रो-रो बोटीवर मास्क नसल्याने दंड भरल्याचं वृत्त चुकीचं | मनसेकडून खुलासा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे त्यांना १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी दैनिकात यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार राज ठाकरे हे शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी उद्घोषणा केली जात होती. मात्र, ही बाब बहुधा राज ठाकरे यांच्या लक्षात आली नाही. परिणामी राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही शिलगावली होती. हा प्रकार रो-रो बोटीवरील अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने राज ठाकरे यांना नियमाविषयी सांगितले. राज ठाकरे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत १००० रुपयांचा दंड भरला.
4 वर्षांपूर्वी -
भिंवडीत तीन मजली इमारत कोसळली | दहा जणांचा मृत्यू
भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
तोंडाला मास्क नसल्याने पेट्रोल देण्यास नकार | पेट्रोल पंपाची केली तोडफोड
येथील माणिकपूर परिसातील पेट्रोलपंपवर तुफान राडा झाला. वसई पश्चिमेकडील या पेट्रोलपंपावर १० ते १२ जणांनी धिंगाणा करत पेट्रोलपंपची तोडफोड केली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मास्क नसल्यामुळे पेट्रोल देण्यास पेट्रोलपंपचालकांनी नकार दिला. हा राग मनात धरुन तरुणांनी पेट्रोलपंपवर येवून तोडफोड केली. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करा | शिवसेना आयटी सेलकडून तक्रार
बॉलिवुड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यामध्ये आता रोजच शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. दरम्यान मुंबई शहराची तुलना पाकिस्तान व्याप्त कश्मीर सोबत केल्यानंतर ट्वीटरवर सेना कार्यकर्ते आणि कंगनामध्ये कलगीतुरा चांगला रंगला आहे. या प्रकरणामध्ये आता शिवसेना आय टी सेल कडून ठाण्याच्या श्रीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कंगना च्या मुंबईला POK सोबत तुलना करण्यावरून देशद्रोहाचा आरोप लावत FIR दाखल करण्याबाबत सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा - खा. श्रीकांत शिंदे
मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
निसर्ग वादळची नुकसान भरपाई अजून पूर्ण मिळाली नाही | आता महाड इमारतीच्या मदतीची घोषणा
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पीएमओकडून ट्विट करुन दुर्घटनेत जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना केली आहे. महाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी अतिशय दु:ख आहे. स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाकडून या दुर्घटनेठिकाणी बचावकार्य सुरु आहे. यासाठी सर्व शक्य ती मदत केली जाणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई बाहेरील क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते | तयारीत रहावे लागेल - मुख्यमंत्री
जूनपासून मिशन बिगेन अगेन सुरु झाले आहे. त्यानूसार इतर सर्वांनी जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही. आपण ज्या ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरु केल्या आहेत. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. पण, ज्या गोष्टी सध्या उघडता येणो शक्य नाही, किंवा त्या उघडण्याची खात्री होत नाही, तोर्पयत त्या सुरु केल्या जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम