महत्वाच्या बातम्या
-
पिंक सिटी जयपूर नाही; हे आहेत शिवसेनेची सत्ता असलेल्या प्रदूषित डोंबिवलीचे रस्ते
रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोंबिवली शहर नेहमीच चर्चेत असते. परंतु, मंगळवारी एमआयडीसी’तील फेज २ मधील एक रस्त्यावर रासायनिक पदार्थ सांडल्याने तो गुलाबी, लाल रंगाचा झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी उग्र दर्प येत असल्याच्या तसेच डोळे चुरचुरणे यासारखा त्रास झाल्याच्या तक्रारी केल्या. दरम्यान, हे प्रदूषण नसल्याचा दावा कारखानदारांच्या ‘कामा’ संघटनेने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रदूषणाच्या प्रश्नावरून मनसे आ. राजू पाटील यांचा डोंबिवलीच्या जावयाला इशारा: सविस्तर वृत्त
औद्योगिक प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवली शहराचं नाव नेहमी चर्चेत असतं. कधी हिरवा पाऊस, नालातल्या घाणं पाणी तर आता चक्क गुलाबी रस्ता डोंबिवलीच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. इतकचं नाही तर या प्रदुषणामुळे गणेशोत्सवात गणपतीची मूर्तीही काळी पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवली शहराच्या प्रदुषणाबाबत वादंग निर्माण झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसे 'हिंदुत्वाची' थेट जाहिरातबाजी...'बांगलादेशींनो चालते व्हा': सविस्तर वृत्त
पनवेलमध्ये घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बांगलादेशींना खळ खट्याकचा इशारा देण्यात आला आहे. ‘बांगलादेशीनो चालते व्हा’, असे सांगणारे पोस्टर पनवेलमध्ये पाहायला मिळत आहेत. ९ फेब्रुवारीला बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आझाद मैदान इथे मोर्चा होणार आहे. या पार्श्वभुमीवर पनवेल परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांगलादेशींना जाहीर आव्हान दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
उंबार्ली टेकडी आग प्रकरण: सखोल चौकशी संदर्भात आ. राजू पाटील यांचं पोलीस आयुक्तांना पत्र
डोंबिवलीजवळील निसर्गरम्य टेकडी आणि कावळ्याचा गाव म्हणून परिचित असलेल्या उंबार्ली टेकडीला २५ जानेवारीला दुपारच्या वेळी अज्ञात व्यक्तीने आग लावली. उन्हाचा पारा वाढलेला असल्यामुळे ही आग काही क्षणात सर्वत्र पसरली. यामुळे टेकडीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे. आगीत या टेकडीवर लावण्यात आलेले अनेक डेरेदार वृक्ष होरपळले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. या भागाचे झपाट्याने नागरिकरण होत असून भूमाफियांनीच ही आग लावली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत भाजपाला खिंडार पडणार; १५ नगरसेवक राष्ट्रवादी-शिवसेनेत प्रवेश करणार
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पक्षात आणून संपूर्ण शहरात शिवसेनेला एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे सध्या नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये शिवसेना सत्तेच्या जोरावर पक्ष विस्तार करण्याची योजना आखात आहे आणि त्यात नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने त्याला प्राधान्य दिल आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण'मधील २७ गावं आणि टोरंट कंपनी संदर्भात आ. राजू पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला
आधी महापालिका नको आणि आता जिल्हा परिषद नको अशी भूमिका घेणाऱ्या कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांचा तत्कालीन महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा महापालिकेत समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रस्तावास मान्यता दिली होती, आणि त्याच आठवडय़ात अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली होती. मात्र आजही या गावांचा प्रश्न जैसे थे राहिल्याने आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघातील येणाऱ्या दिवा शीळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्याच्या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील या विषयाला अनुसरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर विषय त्याच्यासमोर ठेऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका; राज्यपालांचा मनसे बाणा
मराठी भाषेबद्दल राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही राहिली आहे. राज्यात राहणाऱ्या परप्रांतीयांनीं देखील मराठी भाषा शिकलीच पाहिजे हे मनसेचा नेहमीच आग्रह राहिला आहे. इतर भाषिकांच्या कार्यक्रमात देखील मनसे अध्यक्षांनी मराठी भाषेच महत्व मांडलं आहे. त्यामुळे मनसे नेहमीच परप्रांतीय लोंढ्यांच्या नजरेत खुपली आहे. मराठी बद्दलची कोणतीही भूमिका मनसेच्या नेत्यांनी मांडताच त्यावर बातम्या बनतात, मात्र मनसे व्यतिरिक्त एखादी महत्वाची व्यक्ती मराठीचा आग्रह मांडते, तेव्हा मात्र ती भुमीका अत्यंत सौम्य पणे घेतली जाते.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवली: आ. राजू पाटील यांचं शहरातील प्रदूषण व अस्वच्छतेच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांना पत्र
‘मला कोणतीही टीका करायची नाही. पण मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे,’ असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. प्रदुषणाला आणि अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत याबाबत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विनयभंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं अखेर निलंबन; राज्य सरकारचा निर्णय
पुणे येथील एमटी विभागात डीआयजी पदावर होते असलेले डीआयजी निशिकांत मोरे यांचे अखेर गुहा विभागाने निलंबन केले आहे. विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आजच फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने विनयभंगाचा आरोप केल्याने तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
पालघर झेडपी: भाजप-मनसे युतीचा फायदा, मनसेचे दोन उमेदवार विजयी
पालघरमधील वाडा मतदारसंघामध्ये भाजपाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा फोटो असल्याचे समोर आले होते. या बॅनरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर वाडा तालुक्यातील पंचायत समितीत भाजपा आणि मनसेने युती केली असल्याची माहिती भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
सध्याचं राजकारण पाहता भविष्यात भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात: आ. राजू पाटील
३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
मनसे, काँग्रेसच्या मदतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आर्थिक नाड्या भाजपाकडे
कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विकास म्हात्रे यांनी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने विजय मिळवून सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला. काँग्रेस आणि मनसेने भारतीय जनता पक्षाला मदत केल्यामुळे निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ समसमान झाले होते. परंतु, ऐन मतदानाच्या दिवशी शिवसेनेचा एक सदस्य आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकला नाही आणि त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार गणेश कोट यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना आता दुसरं काम आहे का? ते बिचारे आता असं करणारचं: जयंत पाटील
महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नाही, खातेवाटप हे नक्की लवकरात लवकर होईल. फडणवीस म्हणतात तसं थोड्या दिवसांच सरकार हे थोडंथोडं करून पाच वर्षे पूर्ण करेल. तसेच, फडणवीस यांना आता दुसरं काही काम आहे का? ते बिचारे आता असं करणारचं, असा टोला राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांची बैठक पार पडल्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचा जनमतावरून सेनेवर पुन्हा हल्लाबोल; अजून धक्क्यातून सावरले नसल्याची चर्चा
जनतेने आम्हाला जनमत दिलं होतं, परंतु शिवसेनेने बेईमानी केली अशी टीका माजी मुख्यमंंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं असाही टोला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी लगावला. एवढंच नाही तर ठाकरे सरकारवरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीची घोषणा देणार होती परंतु ते आश्वासन ठाकरे सरकारनं पाळलं नाही अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
आ. राजू पाटील यांच्या प्रयत्नाने लोकग्राम रेल्वे पादचारी पुलासाठी ३८ कोटी ५७ लाख निधी मंजूर
देशभर आमदार आणि खासदार असे महत्वाचे लोकप्रतिनिधी नकोत्या विषयात गुंतलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं आहे त्यासाठी ते पूर्णत्वाला घेऊन जाण्यात गुंतले आहेत. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच ते विकास कामांचा मोगोवा घेत होते.
5 वर्षांपूर्वी -
नागरी समस्यांसंदर्भात मनसेचं वाशी वॉर्ड ऑफिसवर हल्ला बोल आंदोलन
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरी समस्यांवरून मैदानात उतरली असून दर आठवड्याला काही ना काही आंदोलन करून पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याचा सपाटा लावला आहे. नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नैतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO - ठाणे रेल्वे स्थानकात चक्क कचऱ्याच्या डब्यात चहाचे ग्लास धुतले जातात
सामान्य लोकांचा आरोग्याच्या बाबतीत सार्वजनिक ठिकाणी आढळणारे फेरीवाले आणि स्टॉल्स नेहमीच अस्वच्छतेचाच पाढा गिरवतात हे अनेकदा समोर आलं आहे. गटाराच्या पाण्यात भाजीपाला धुणे आणि पाणीपुरी बनविण्यासाठी लागणारं पाणी थेट बाजूच्या सुलभ सौचालायातून व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं असेल, मात्र त्यात अजून एक भर पडली आहे असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई: नागरी समस्यांवरून मनसेचं कोपरखैरणे विभाग कार्यालयावर ढोल वाजवा आंदोलन
नेरुळ विभाग कार्यालयावर मागील आठवड्यात सामान्य नागरिकांच्या विविध समस्यांवरून मोर्चा काढल्यानंतर आज मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नैत्रुत्वात कोपरखैरणे विभाग कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपरखैरणे विभागातील लोकांच्या विविध समस्यांवरून मनसे ढोल वाजवत मोर्चा काढणार असून, सुस्त प्रशासनाला जाग आणण्याच्या उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवली: लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू; खा. सुप्रिया सुळेंनी संसदेत विषय मांडला होता
डोबिवली लोकलच्या गर्दीने आणखी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. भरगच्च लोकलमधून पडल्याने एका २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. चार्मी पासद असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
5 वर्षांपूर्वी -
वाद उफाळला! मी तोंड उघडलं तर हा नवी मुंबईत तोंड लपवत फिरला असता: अविनाश जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या ठाणे आणि नवी मुंबईतील पक्षांतर्गत घडामोडींमुळे वाद उफाळून आल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे मनसेत महत्वाची जवाबदारी असणारे नेतेच थेट खुलेआम समाज माध्यमांवर संताप व्यक्त करत असल्याने त्यांना कोणत्याही परिणामांची देखील चिंता नसावी असंच सगळं चित्र आहे. या राजकारणाला सुरुवात अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या नवी मुंबईतील थाळीनाद मोर्चापूर्वीच झाली होती, ज्यापासून वरिष्ठ पातळीवरील काही पदाधिकारी वगळता सामान्य कार्यकर्ते अंधारात होते असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY
- BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL
- Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 10 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: TATAPOWER
- Car Loan EMI | या दिवाळीत स्वप्नातली कार खरेदी करताय, हे 4 उपाय EMI चं टेन्शन दूर करतील, लवकर फिटेल कर्ज - Marathi News
- Trending Video | फिरायला गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या विळख्यात, पुढे असं घडलं की विश्वास बसणार नाही, पहा व्हिडिओ
- iPhone 16 | आता iPhone 16 खरेदी करा ते सुद्धा 10 हजाराच्या सूटवर, झटपट फोन हातात, इथून करा ऑर्डर - Marathi News