ठाणे पालिका: मनसेचे संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्याने रुग्णांना PPE किट निम्या दरात
ठाणे, १५ जुलै : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी करोनाचे १ हजार ५०३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकुण संख्या ५८ हजार ५०७ इतकी झाली आहे. तर, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकुण संख्या १ हजार ६८९ वर पोहोचली आहे.
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी १ हजार ५०३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील ३४४, कल्याण-डोंबिवली शहरातील ३३६, नवी मुंबईतील २३९, उल्हासनगरमधील १९३, ठाणे ग्रामीणमधील १६४, मीरा-भाईंदरमधील १०५, अंबरनाथमधील ४९, बदलापूर शहरातील ४७ आणि भिवंडीतील २६ रुग्णांचा समावेश आहे.
दुसरीकडे कोरोना आपत्तीने कंटाळलेल्या सामान्य गोरगरीब रुग्णांना पीपीई कीट तिप्पट दराने विकून ठाण्यात खासगी रुग्णालयांकडून लूट सुरु होती. या पीपीई कीट घोटाळ्यात मेडीकल चालकही उतरले असून खासगी रुग्णालयांच्या साथीने त्यांनी रुग्णांच्या खिशाला काञी लावण्याचा गोरखधंदा थाटला होता. याप्रकरणी ठाणे पालिका प्रशासन व एफडीएकडे मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी विषय उचलून धरला आणि त्याचा पाठपुरावा देखील केला.
ठाण्यातील अंबिकानगर परिसरात असणार्या स्वस्तिक हाॅस्पिटलमध्ये ११ ते १७ जूनदरम्यान कोरोना रुग्णावर उपचार करण्यात आले. या रुग्णाच्या एकूण बिलापैकी तब्बल ४९ हजार ३५० रुपये पीपीई किटबाबत लावण्यात आले. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी पाचंगे यांनी अधिक माहिती घेतली असता पीपीई किटचा दर २३५० रूपये इतका आकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणी हाॅस्पिटल व संबधित मेडिकलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका उपायुक्त केळकर आणि अन्न व औषध विभाग परिमंडळ एकच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांची भेट घेत निवेदनाद्वारे पाचंगे यांनी केली होती. त्यानुसार एफडीएने मेडीकलची तपासणी केली असून सध्या सबंधित मेडिकल २ हजार रुपये दराचे पीपीई किट १२०० रुपये दराने विकत असल्याचे पाचंगे यांना एफडीएने दिलेल्या पञात नमूद केले आहे.
News English Summary: The corona patient was treated at Swastik Hospital in Ambikanagar area of Thane from June 11 to 17. Out of the total bill of this patient, Rs. 49,350 was charged for PPE kit. The relatives of the patient lodged a complaint with the district president of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena, Sandeep Pachange.
News English Title: PPE kits will be available at half price as per FDA directives after MNS Sandeep Pachange complaint News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News