16 April 2025 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

VIDEO - ....तर मनसे कार्यकर्त्यांना शिवसेना स्टाईलने चोप देण्याचा इशारा

ShivSena corporator, Mahesh Gaikwad,  Warning to MNS, Avinash Jadhav

ठाणे, ३ जुलै : मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अविनाश जाधव यांना 1 ऑगस्टला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. अविनाश जाधव यांना कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टात हजेरीसाठी नेत असताना मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता. यावेळी मनसैनिकांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

अविनाश जाधव यांना (31 जुलै) ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्यांना ठाण्यातील कापूर बावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. अविनाश जाधव यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आज ३ ऑगस्टपर्यंत अविनाश जाधव यांना पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे.

“हा सर्व प्रकार राजकारणातील सूड बुद्धीने केलेला आहे. मौका सभी को मिलता है, एकवेळ सत्ता आमची देखील असेल, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरु,” असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला होता. दुसरीकडे मनसेमध्ये ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खदखद वाढली असून आगामी काळात त्याचे राजकीय परिणाम देखील दिसतील असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर शिवसेनेच्या नेते मंडळींकडून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांनी फेसबुकला व्हिडिओ शेअर करुन मनसेला इशारा दिला आहे. महेश गायकवाड म्हणाले की, पालकमंत्र्याच्या विरोधात टीका केली तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ. सध्या कोरोना संकट असल्याने शिवसैनिक संयम ठेवून आहेत. पण याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि सहन करू असे नाही. या पुढे जर टीका केलीत तर आता शिवसेना स्टाईलने चोप देऊ, असा इशारा महेश गायकवाड दिला आहे. त्यामुळे ठाण्यातील मनसे आणि शिवसेनेचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालकमंत्र्यानी कोल्हापूर, सांगलीचा पूर असो किंवा आता आलेले कोरोना संकट असो, अशा प्रत्येक वेळी आपला जीव धोक्यात घालून काम केल आहे. त्यांना कुणाच्या पोचपवतीची गरज नाही, असं देखील महेश गायकवाड यांनी सांगितले आहे.

 

News English Summary: Shiv Sena corporator and standing committee member Mahesh Gaikwad has warned MNS by sharing a video on Facebook. Mahesh Gaikwad said that if he criticizes the Guardian Minister, he will give a beating in Shiv Sena style.

News English Title: Shiv Sena corporator Mahesh Gaikwad has given a warning to MNS News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AvinashJadhav(12)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या