वीज बिलात ना माफी ना सूट | शिवसैनिकांचं 'ते' चड्डी बनियन आंदोलन देखील वाया
वसई, १७ नोव्हेंबर: महावितरणने अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी जुलै महिन्यात महावितरणवर चड्डी बनियन मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे आमच्या अंगावर केवळ चड्डी बनियन उरलीय, तुमचे बील कुठून भरणार? असा सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला होता. राज्यात शिवसेना आघाडीची सत्ता असतानाही शिवसैनिकांनी हा सवाल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर महावितरणने ग्राहकांना वीज बिल पाठवली आहेत. मात्र, ही वीज बिले प्रमाणापेक्षा अधिक असल्याने ग्राहकांचा संताप वाढला आहे. आधीच लॉकडाऊनमुळे कामधंदा नाही, त्यात ही वीज बिले भरायची कुठून? असा सवाल सामान्यांमधून होत असतानाच वसई-विरारमधील शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयावर चड्डी बनियन आंदोलन केलं होतं.
त्यावेळी ३० ते ४० शिवसैनिकांनी चड्डी बनियन घालून महावितरणच्या कार्यालयाला धडक दिली होती आणि वाढीव बिलाबाबत जाब विचारला होता. लॉकडाऊनमुळे अंगावर केवळ चड्डी बनियन उरली आहे. तुमचे बील भरायचे कसे? असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी केला. शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण, उपविभागप्रमुख प्रसाद वर्तक, शाखाप्रमुखांनी वसई पश्चिमेकडील महावितरणच्या कार्यालयात जाऊन हे निवेदन दिले होते आणि महावितरणने जनतेच्या अंगावरील उरलेसुरले कपडे उतरवू नये अशी मागणी केली होती. तसेच वाढीव बिल रद्द करण्याचीही मागणी केली होती.
दरम्यान, लोकांनी वीज वापरली त्याचे बील भरावे कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे आहेत. वाढीव वीज बिलातून सवलत देणे राज्य सरकारला परवडणारं नाही तसंच ते आर्थिंक दृष्ट्या अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्याचाच पुनरुच्चार राऊत यांनी पुन्हा केला.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रसार माध्यमांकडे दिलेलं स्पष्टीकरण नेमकं काय आहे.
वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बिल सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असं नितीन राऊत म्हणाले. महावितरणने २४ तास वीज उपलब्ध केली. लोकांनी वीज वापरली त्याची बिलं भरावी. वीज कंपनीने लॉक डाऊनमध्ये वीज पुरवठा केला. महावितरणवर ६९ हजार कोटी कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला आहे. दरम्यान, महावितरणने वीजबिल वसुलीबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार डिसेंबर २०२० पर्यंत थकीत वीजबिले भरावी लागणार आहेत.
News English Summary: Shiv Sainiks, outraged by MSEDCL sending Awwa’s Savva electricity bill, staged a Chaddi Banian Morcha on MSEDCL today. This time they left us only shorts and bunions due to lockdown, where will you pay your bills? He asked this question to the officials of MSEDCL.
News English Title: Shivsainik Chaddi baniyan agitation in Casai against Mahavitaran News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल