नवी मुंबईत करोनाबाधित महिलेचा मृत्यू; कारण अजून निश्चित नाही
नवी मुंबई, २६ मार्च : वाशी येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा आज मृत्यू झाला. मात्र, या महिलेच्या मृत्यूचं कारण गुलदस्त्यात आहे. या महिलेचा मृत्यू करोनाने झाला की अन्य कारणाने याचा तपास केला जात असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगितलं जात आहे. या महिलेचा करोनाने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यास राज्यातील करोनाचा हा चौथा बळी असेल असेही सूत्रांनी सांगितलं. सदर महिला वाशीतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. तिला करोनाची लागण झाल्याचंही निष्पन्न झालं होतं. मात्र, तिचा करोनानेच मृत्यू झाल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरोग्य विभाग याबाबत तपास करत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात झालेला महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ४ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे आज पुन्हा दोन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
राज्यातील कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातून दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्याचा आकडा १२४ वर गेला आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री बुधवारपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य सरकारनेही यापूर्वीच उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे.
News English Summery: A woman who was being treated at a private hospital in Vashi died today. However, the cause of this woman’s death is in the bouquet. The Health Department is investigating whether the woman died from coronas or for other reasons. The woman will be the fourth victim of coronas in the state if the woman is found to have died of coronas, sources said. The woman was undergoing treatment at a private hospital in Vashi. She was also diagnosed with coronary infection. However, it is not yet clear whether she died of coronary artery. The health department is investigating the matter.
News English Title: Story 65 year old woman from Navi Mumbai who tested positive for Corona Virus passes away News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News