15 January 2025 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

मुंब्रा, शिळ, कळव्यातील लोकांचा विरोध डावलून सरकारकडून टोरंट कंपनीची नेमणूक

Torrent company, Mumbra Sheal, Kalwa areas, MNS MLA Raju Patil

कल्याण-डोंबिवली: मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी १ नोव्हेंबर २०१९ रोजी आगरी समाज प्रतिष्ठानने टोरेंट पॉवर कंपनीविरोधात आयोजित केलेल्या भव्य मोर्चात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले की, सदर कंपनीला माझा यापूर्वीच विरोध राहिलेला आहे आणि राज्यातील मंत्रिमंडळ अजून ठरलं नसल्याने प्रशासनाने तूर्तास या कंपनीच्या नव्या कार्यालयास स्थगिती द्यावी अशी विनंती देखील केली आहे. काही झालं तरी आम्ही टोरेंट पॉवर कंपनी येथून हटवणार म्हणजे हटवणार असा निश्चय यावेळी करण्यात आला होता.

तत्पूर्वी, डोंबिवली जवळील आणि शीळरोडवरील देसाई गावात देखील आगरी समाज प्रतिष्ठानचे टोरेंट पॉवर कंपनी विरोधात आमरण उपोषण पुकारली होती, मात्र त्यावेळी स्थानिक राजकीय नेत्यांच्या हाकेला प्रशासनाने केराची टोपली दाखवली होती. टोरेंट पॉवर कंपनी हटाव अशी मागणी आगरी-कोळी संघटना तसेच इतर काही संघटनाने अनेक वेळा केली आहे.

शीळरोड वरील विविध गावे, दिवा, मुंब्रा याभागात टोरेंट पॉवर या कंपनीला विजेच कंत्राट देण्यात आले आहेत आणि ती रद्द करावी यासाठी आगरी समाज प्रतिष्ठानने अनेक उपोषणं केली आहेत, मात्र त्याला यश आलेले नाही. सदर उपोषणला गावातील नागरिकांनी जाहीर पाठींबा दिला होता. मात्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र आगरी समाजाचे आमदार राजू पाटील आणि मनसेचे आक्रमक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी रस्त्यावर उतरणार असल्याने गावकऱ्यांच्या आणि आगरी-कोळी समाजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. स्वतः आमदार राजू पाटील यांनी हा विषय सरकार दरबारी देखील उचलून धरणार असल्याचं म्हटलं होतं.

मात्र मुंब्रा, शिळ आणि कळवा परिसरात वीज वितरण आणि देयक वसुलीचे कंत्राट टोरंट या खासगी कंपनीला देऊ नका, या मागणीसाठी आंदोलने करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने सत्तेवर येताच विरोधाची तलवार म्यान करत या कंपनीच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भाजप सरकारने भिवंडी महापालिकेचा २८५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या टोरंटला करमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने नागरिकांच्या विरोधानंतरही टोरंट कंपनीला कंत्राट देऊ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षात असताना टोरंट कंपनीला विरोध केला होता.

मुंब्रा, शिळ आणि कळवा या परिसरात वीज वितरण आणि वसुलीचे कंत्राट टोरंट या खासगी कंपनीला देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्यानुसार २६ जानेवारी २०१९ पासून ही कंपनी परिसरात काम सुरू करणार होती. मात्र, या खासगीकरणाला नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला होता. तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी समन्वय समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे स्थानिक नेते दशरथ पाटील हे आहेत.

खासगी कंपनीमुळे ग्राहकाला वीजदेयकात मोठा भरुदड बसणार असून महसुलातही तूट येणार असल्याचा दावा समितीने केला होता. तसेच या कंपनीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेचे नेते आणि नागरिक सहभागी झाले होते. मुंब्रा, शिळ आणि कळवा या विभागासाठी टोरंट या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून या कंपनीद्वारे येत्या १ मार्चपासून परिसरात वीजसेवा देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील इतर ग्राहकांना लागू असणाऱ्या आणि वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचलित दरानुसारच वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

 

News English Summery: MNS MLA Raju Patil from Kalyan Rural, had participated in the grand march organized by the Agri Samaj Pratishthan against Torrent Power Company on November 1, 2019. At that time, a statement was given to the Collector collecting huge marches. Speaking to the media at the time, MLA Raju Patil said, “I have already been opposed to this company and the cabinet has not yet been decided. The administration has also requested that Tortus be suspended for his new office.” In any case, it was decided that we would delete the Torrent Power Company from here. Earlier, in the village of Desai, near Dombivli and in Shill Road, Aam Aadmi Samaj Pratishthan had called a fast against the Torrent Power Company, but at that time, the administration had shown Kera’s basket to the local political leaders. Agari-Koli organizations as well as some other organizations have demanded several times to delete the Torrent Power Company.

 

Web News Title: Story appointment of Torrent company for Mumbra Sheal and Kalwa areas.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x