भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
मीरारोड: महिलांच्या सुरक्षेवरून राज्यभरात आंदोलन करणाऱ्या भाजपमध्येच महिला कशा असुरक्षित आहे याचा पाढा भाजपच्या नगरसेविकेने वाचला होता. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता महिलांची छळवणूक करीत आहेत त्यांच्याकडून मला व माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचा बॉम्बगोळा भाजपच्या विद्यमान नगरसेविका नीला सोन्स यांनी टाकला होता. तसे पत्र त्यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले होते. इतक्यावरच न थांबता नीला सोन्स यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून मेहता यांच्या महिलांबाबतच्या कारनाम्यांचा पंचनामा केला होता.
दरम्यान, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मिरारोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी भाजपच्या नगरसेविकेनं नरेंद्र मेहता यांच्याविरोधात लैगिंक शोषणाचा आरोप केला होता. त्यावरून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा गाजला होता. अखेर आज नगरसेविकेच्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे.
भाजप नगरसेविकेने केलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, ‘नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या कुटुंबियाला धोका आहे. नरेंद्र मेहतांनी १९९९ पासून ते २०२० पर्यंत माझे लैंगिक शोषण केले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी त्यांनी माझा वापर करून घेतला होता. माझ्याप्रमाणेच मेहता यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे.’ दरम्यान, भाजपच्या नगरसेविकेने याप्रकरणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली.
News English Summery: A rape case has been registered against BJP leader and former MLA Narendra Mehta. A BJP corporator in Mira Bhayander Municipal Corporation had accused Narendra Mehta of sexually abusing and torturing several women. The corporation had filed a complaint with the Konkan Inspector General in this regard. A case has been registered against Narendra Mehta late on Thursday night at the Meera-Bhayandar police station. Due to the crime, Narendra Mehta is now being arrested at any moment. Narendra Mehta is currently absconding. Three days ago, he had resigned from the BJP. So two days ago, an obscene video of Narendra Mehta also went viral on social media.
Web News Title: Story BJP Former MLA Narendra Mehata FIR registered against rape case.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC