21 December 2024 10:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

फरहान आझमी म्हणतो..तर आम्ही बाबरी मस्जिद बनवू...हे सेनेला पटणार का? सोमैया

CM Uddhav Thackeray, BJP Former MP Kirit Somaiya, Ram Mandir, Babri Masjid

नवी मुंबई: नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी म्हटलं की, ‘कल भी हमारा था, आज भी हमारा है, कल भी हमारा होगा’. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पक्ष, डीएमके या पक्षांना वंशवादाची लागण झाली आहे. फक्त भारतीय जनता पक्ष असा पक्ष जो एका चहावाल्याला पंतप्रधान आणि मिल कामगाराच्या मुलाला राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनवू शकतो.

यावेळी माजी खासदार सोमय्या यांनी आपल्या भाषणाची सुरवातच शिवसेनेवर टीका करून केली. एकीकडे संजय राऊत घोषणा करतात की उद्धव ठाकरे 7 मार्चेला राम मंदिरात जाणार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याचसोबत सत्तेत असलेला त्यांचा जोडीदार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा म्हणतो की, उद्धव ठाकरे रामंदिरात जाणार असेल तर आम्ही सुद्धा बाबरी मस्जिद बनवू. त्यामुळे हे शिवसेनेला पटणार आहे का ? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंना रात्र-दिवस फक्त कमळचं दिसत आहे. तर आम्हाला तुमचं सरकार पाडण्यासाठी कोणत्याच ऑपरेशन राबवण्याची गरज नाही. कारण तुमचा एक पाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ओढत आहे, तर दुसरा पाय राहुल गांधी ओढतायत. जे सरकार स्वता:च पडणार, त्याच पाप आम्ही का घ्यावा? अशी जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी शिवसेनेवर केली आहे.

 

Web Title: Story BJP Former MP Kirit Somaiya criticized CM Uddhav Thackeray over Ram Mandir and Farhan Azami Statement over Babri Masjid.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x