15 January 2025 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
x

... मग पवार साहेबांचाही बाप काढणार का? गणेश नाईक संतापले

BJP Leader Ganesh Naik, Minister Jitendra Awhad, Sharad Pawar

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे. पक्ष बदण्याच्या भूमीकेवरुन गणेश नाईकांवर टीका करताना, मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी काल म्हटलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांनीही (शरद पवार) अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी विचारला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी बाप बदलणारी औलाद नाही, अशी खोचक टीका गणेश नाईकांवर केली होती. त्याला नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पवारांनीही तीनवेळा पक्ष बदलला आहे. मग त्यांचीही गणना बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार का? असा सवाल नाईक यांनी केला. पवारांनीही समाजकारण आणि राजकारण गतीमान व्हावं यासाठी एस काँग्रेसची स्थापना केली होती. पुलोद सरकारचं नेतृत्व केलं होतं. नंतर पुन्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९९९मध्ये पुन्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली. मग याला काय म्हणाल? असा सवालही नाईक यांनी केला.

माननीय शरद पवार साहेब पूर्वी काँग्रेसमध्ये होते. युवकपासून मंत्रिमंडळातसुद्धा ते होते. नंतर समाजकारण, राजकारण गतीमान व्हावं यासाठी त्यांनी एस काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी पुलोद सरकारचं नेतृत्व केलं आणि कालांतरानं औरंगाबाद मुक्कामी असताना राजीव गांधींच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परत पुढे १९९९ साली स्वाभिमानाच्या मुद्द्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, असं म्हणत नाईक यांनी पवारांच्या पक्षांतराचा उल्लेख केला.

 

News English Summery: NCP leaders and Home Minister Jitendra Awhad and Ganesh Naik, who have left the BJP with the support of the NCP, are already in the fray. After Jitendra Awhad referred to Ganesh Naik as a rebel, the level of criticism has now reached the father. Jitendra Awhad had yesterday said that I do not have a habit of changing my father every 10 years, while criticizing Ganesh Naik from the role of party change. Speaking on that, Pawar Saheb (Sharad Pawar) changed sides too many times, so will his father now? This question has been asked by Ganesh Naik. Jitendra Awhad had criticized Ganesh Naik for criticizing his father for not changing his father. He was replied by Naik. Pawar has also changed the party three times. Will they even count them in the Father’s changing children? Naik questioned this. Pawar too had established the S Congress to accelerate social and politics. The Pulod government was headed. Later he joined the Congress again in the presence of then Prime Minister Rajiv Gandhi. He then left the Congress again in 1999 and formed the NCP. What do you call it? Naik also questioned this.

 

Web News English: Story BJP leader Ganesh Naik slams minister Jitendra Awhad attacks NCP President Sharad Pawar.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x