22 November 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शिवसेनेला 'खान पाहिजे की बाण'? रावसाहेब दानवेंचा शिवसेनेला टोला

BJP MP Raosaheb Danve, Shivsena, NCP, Congress

नवी मुंबई: नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी म्हटलं की, ‘कल भी हमारा था, आज भी हमारा है, कल भी हमारा होगा’. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पक्ष, डीएमके या पक्षांना वंशवादाची लागण झाली आहे. फक्त भारतीय जनता पक्ष असा पक्ष जो एका चहावाल्याला पंतप्रधान आणि मिल कामगाराच्या मुलाला राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनवू शकतो.

दरम्यान, राज्यातील सर्वच प्रमुख भाजप नेत्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली. खासदार रावसाहेब दानवे यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेला लक्ष केलं. यावेळी हिंदुत्वाला मुद्द्याला स्पर्श करताना रावसाहेब दानवे म्हणाले की शिवसेनेनेला नेमका ‘खान पाहिजे की बाण’? असा प्रश्न विचारात टोला लगावला.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटी मागणी करण्यात येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला. याशिवाय, सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना कशी बसते? अशा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. शिवाय, अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचे खरे रक्त जागे होईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

 

Web Title: Story BJP MP Raosaheb Danve criticized Shivsena over alliance with Congress and NCP.

हॅशटॅग्स

#RaoSahebDanve(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x