5 January 2025 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या
x

शिवसेनेने भाजप, मतदार जनता आणि शेतकऱ्यांसोबत सुद्धा दगा केला: चंद्रकांत पाटील

Mahavikas Aghadi, CM Uddhav Thackeray, BJP Chandrakant Patil

नवी मुंबई: नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी म्हटलं की, ‘कल भी हमारा था, आज भी हमारा है, कल भी हमारा होगा’. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पक्ष, डीएमके या पक्षांना वंशवादाची लागण झाली आहे. फक्त भारतीय जनता पक्ष असा पक्ष जो एका चहावाल्याला पंतप्रधान आणि मिल कामगाराच्या मुलाला राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनवू शकतो.

तर याचवेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर सुद्धा निशाणा साधला. सेनेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिवसातून दोन-दोन जाण्यासाठी वेळ होता. दिल्लीत जाऊन सोनिया गांधींना भेटायला वेळ होता. मात्र महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला फोन घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. तर शिवसेनेने फक्त भाजपचं नाही, तर महाराष्ट्रातील मतदार जनता व शेतकऱ्यांसोबत सुद्धा दगा केला असल्याचे पाटील म्हणाले.

 

Web Title: Story BJP State President slams Shivsena Chief Uddhav Thackeray over alliance of Mahavikas Aghadi.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x