24 November 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची
x

कोरोना लॉकडाउन असताना फिरणाऱ्या दुचाकी स्वाराने पोलिसावर गाडी घातली

Corona Crisis, Maharashtra Police

वसई, २५ मार्च : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. दररोज नवीन रुग्णांची यात भर पडत आहे. देशभरात लॉकडाउन जाहीर झालं आहे. पोलीस आपला जीव धोक्यात घालून लोकांना घरात राहण्यास सांगत आहे. पण, वसईमध्ये एका तरुणाने पोलिसांवरच गाडी घालून जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

मुंबई जवळील नालासोपाऱ्यात एका दुचाकी स्वाराने पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घातल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसईत बुधवारी एका टवाळखोर दुचाकीस्वाराने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी चढवल्याची घटना घडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

सुनील पाटील वसईच्या वाकनपाडा परिसरात बंदोबस्तावर होते. यावेळी काही टवाळखोर तरूण रस्त्यावर दुचाकी फिरवत होते. या तरुणांना पोलीस पकडायला गेल्यावर हे तरुण दुचाकीस्वार पळ काढत होते. त्यावेळी सुनील पाटील एका दुचाकीसमोर उभे राहिले. या दुचाकीस्वाराने कोणतीही पर्वा न करता भरधाव वेगातील दुचाकी सुनील पाटील यांच्या अंगावर चढवली. त्यामुळे सुनील पाटील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या वसईच्या आयसीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

News English Summery:  Corona virus is spread in Maharashtra. New patients are increasing daily. Lockdown has been announced across the country. Police are risking their lives and asking people to stay home. However, in Vasai, a tragic incident of a young man was injured on a police train. He was injured when a motorcycle mounted on a sub-inspector’s vehicle in Nalasopara near Mumbai. They are being treated in a private hospital. In Basai, on Wednesday, a twin-wheeler rider drove a car into the police station in the settlement. Deputy Superintendent of Police Sunil Patil was critically injured in the incident.

 

News English Title:  Story Corona virus lock down biker hit and run police officer in Vasai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x