22 January 2025 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

डोंबिवली: एमआयडीसी फेस २ मधील मेट्रो पोलिटीन केमिकल कंपनीला भीषण आग

Dombivli MIDC Fire

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी फेस २ मधील मेट्रो पोलिटीन या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा आहे. आगीमुळे केमिकलच्या ड्रममध्येही सतत स्फोट सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. या आगीनंतर या कंपनीतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सुरुवातीला आगीची तीव्रता कमी होती. मात्र, त्यानंतर एकापाठोपाठ एक स्फोट होऊ लागले. स्फोटांच्या आवाजानं परिसरात घबराट पसरली. काही वेळानं आग अधिकच भडकली. त्यामुळं या कंपनीसह आसपासच्या कंपनीतील कर्मचारी सुरक्षित ठिकाणी गेले. या घटनेत अद्याप कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, मागील २ तासांपासून अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. संपूर्ण परिसरात काळा धूर पसरला आहे. कंपनीत केमिकल साठा असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. अद्याप घटनेत कोणी जखमी आहे की नाही ते स्पष्ट झाले नाही. कंपनीत नेमकी आग कशामुळे लागली हे आताच सांगता येणार नाही, सध्याच्या प्राथमिक माहितीनुसार जीवितहानी नाही, पूर्णपणे माहिती घेणे, आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे अशी माहिती केडीएमसीचे अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे.

 

Web Title: Story fire breaks out at metropolitan industries Dombivli MIDC.

हॅशटॅग्स

#Mumba(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x