18 April 2025 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचे खरे रक्त जागे होईल: देवेंद्र फडणवीस

CM Uddhav Thackeray, Opposition Leader Devendra Fadnavis, Ayodhya, Ram Mandir

नवी मुंबई: नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय. या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, हे सरकार पडावं अशी आम्ही वाट बघत नाही. मात्र आपसातील भांडणांमुळेच हे सरकार कोसळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी महाराष्ट्रात ऐकला चलो रे चे संकेत दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी म्हटलं की, ‘कल भी हमारा था, आज भी हमारा है, कल भी हमारा होगा’. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पक्ष, डीएमके या पक्षांना वंशवादाची लागण झाली आहे. फक्त भारतीय जनता पक्ष असा पक्ष जो एका चहावाल्याला पंतप्रधान आणि मिल कामगाराच्या मुलाला राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनवू शकतो.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटी मागणी करण्यात येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला. याशिवाय, सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना कशी बसते? अशा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. शिवाय, अयोध्येला नक्की जा म्हणजे तुमचे खरे रक्त जागे होईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

 

Web Title: Story Go Ayodhya so your real blood will wake Opposition leader Devendra Fadnavis attacks CM Uddhav Thackeray.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या