15 January 2025 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

व्यंगचित्रासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही: राज ठाकरे

MNS Chief Raj Thackeray, Congress MP Rahul Gandhi

ठाणे : एका मराठी दैनिकाच्या वतीने ठाण्यामध्ये ‘कलासंगम २०२०’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. जेष्ठ पत्रकार अंबरीष मिश्र ही मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली.

राजकारणातील कोणत्या नेत्यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी परफेक्ट आहे असा प्रश्न विचारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा चेहरा देखील व्यंगचित्र काढण्यासाठी योग्य असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा चेहरा चांगला नसल्याचे सांगत राहुल गांधींचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधींचा चेहरा चांगला होता असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

‘आता देशातील राजकारणीच कार्टुनसारखे दिसायला लागले आहेत. त्यामुळे व्यंगचित्र काढायला मजा येत नाही, असं व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी म्हटलं होतं. तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात आता कोणते चेहरे व्यंगचित्र काढण्यासाठी चांगले वाटतात?’ असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चेहरे व्यंगचित्रासाठी चांगले असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात जे काही राजकारण घडलं आहे, मी त्याला दुर्दैवी म्हणेन. मला राजकारणाचा अर्थ हा निवडणुकीच्या पलिकडे आहे असं वाटतं. कारण, निवडणुकीच्या पलिकडे जेव्हा तुम्ही महाराष्ट्र बघता त्या महाराष्ट्राकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा अत्यंत कलात्मक आहे. मी जेव्हा परदेशात जातो तेव्हा तिथं पाहिलेल्या अनेक गोष्टी मला वाटतं महाराष्ट्रात आणल्या पाहिजेत.

ज्या जनेतसाठी तुम्ही आहात, त्यांना घरातून बाहेर पहिलं पाऊल ठेवल्यावरती समाधान वाटलं पाहिजे की, मी या राज्याचा नागरिक आहे. ते देण्यासाठी त्याच्या सभोवताली जे काही वातारवण हवं ते वातावरण निर्माण करण्याचं काम आम्हा लोकांच आहे. ते जर आम्ही चांगल्याप्रकारे करू शकलो, तर तेच मला वाटतं की राजकारण व कला यांचा संगम आहे, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

 

News English Summery: A Marathi daily ‘Kalasangam 2020’ was organized on behalf of a Marathi daily. The program is being announced today in an open interview with MNS President Raj Thackeray. Senior journalist Ambarish Mishra is interviewing. Speaking in the interview, Raj Thackeray criticized Chauffeur over politics. Raj Thackeray also said that the face of Chief Minister Uddhav Thackeray and Nationalist Congress President Sharad Pawar along with Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah were questioned. Raj Thackeray also said that Rahul Gandhi’s father was a good face of former Prime Minister Rajiv Gandhi.

 

Web News Title: Story MNS Chief Raj Thackeray said congress MP Rahul Gandhis face is not fit for cartooning.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x