22 December 2024 4:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
x

नवी मुंबई: मनसेकडून 'पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२०'चं आयोजन; शर्मिला ठाकरेंची उपस्थिती

MNS Leader Gajanan Kale, Paschim Maharashtra Mahotsav 2020, Navi Mumbai, Sharmila Thackeray

नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य ‘पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०२०’चं आयोजन करण्यात आलं असून त्याला शर्मिला ठाकरे आणि मनसेच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. नवी मुंबई शहरातील लोकांसाठी १४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी’पर्यंत विविध कार्यक्रमांची पर्वणी अनुभवता येणार आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लघु उद्योजकांना त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन करण्याची संधी देखील मिळाली आहे.

नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्रातील लोकं वास्तव्यास असून त्यांच्यासाठी हा महोत्सव आठवणींचा ठरला आहे. लवकरच नवी मुंबईमध्ये महानगर पालिकेच्या निवडणुका होणार असल्याने मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी जास्तीत जास्त लोकांना मनसेसोबत जोडण्याची विविध कार्यक्रम राबविण्याचा सपाटा लावला असून त्याला स्थानिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.

एकाबाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपचे विदयमान नगरसेवक फोडण्याची तयारी करत आहेत आणि भाजप अधिवेशन भरवून नवी मुंबईमध्ये शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतली होती, तसेच विविध आंदोलनांच्या माध्यमातून मनसेने लोकांच्या दैनंदिन विषयांना हात घालत प्रशासनाला धारेवर धरून निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Web Title: Story MNS Leader Gajanan Kale organized Paschim Maharashtra Mahotsav 2020 at Navi Mumbai.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x