24 December 2024 8:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

२७ गावांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते पण एकनाथ शिंदेंची नियत? मनसेला शंका

Minister Eknath Shinde, Shivsena, MNS MLA Raju Patil

कल्याण : मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पहिल्यांदाच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘२७ गावांची वेगळी महापालिका करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियत साफ दिसते. मात्र पालकमंत्र्यांची तशी दिसत नाही,’ असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

राजू पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा डोंबिवलीत गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हा मी २७ गावांबाबत स्थानिक लोकांच्या मनातील भावना सांगितल्या होत्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या भावना असतील तर २७ गावांचा निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना दिले होते असं राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. मात्र अजूनही निर्णय न घेतल्यामुळे २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याबाबत उद्धव ठाकरे यांची नियत साफ दिसत आहे. परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची तशी नियत दिसत नसल्याचे सांगत राजू पाटील यांनी टीका केली आहे. त्याचप्रमाणे येत्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट घेणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.

आमदार पाटील यांनी कल्याण डोंबिवलीचे नवीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची काल भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी २७ गावांसंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मंत्रालयात पार पडली होती. मात्र त्यावर काही निर्णय अद्याप झालेला नाही.

 

News English Summery: MNS Kalyan Gramin MLA Raju Patil said that when Uddhav Thackeray came to inspect the pink road in Dombivali, I had told the feelings of the locals about the 27 villages. After this, Uddhav Thackeray directed the Chief Minister Uddhav Thackeray to take care of the 27 villages if the people have feelings, MNS Kalyan Gramin MLA Raju Patil said. However, Uddhav Thackeray’s determination to set up an independent municipality of 27 villages is yet to be decided. But Raju Patil has criticized the Guardian Minister Eknath Shinde for not seeing them as such. MNS MLA Raju Patil said that Uddhav will meet Thackeray again next week.

 

Web News Title: Story MNS MLA Raju Patil criticizes Shivsena leader Minister Eknath Shinde.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x