15 January 2025 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन नवी मुंबईत होणार

Navi Mumbai, MNS Chief Raj Thackeray

मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि अशात सत्ताधारी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नवी मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. गणेश नाईक सध्या भाजपवासी झाले आहेत तर दुसरीकडे त्यांचे समर्थक भाजपाला रामराम ठोकत टप्याटप्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात सामील होतं आहेत.

एका बाजूला गणेश नाईक यांच्या भरोशे नवी मुंबईत सज्ज होतं असताना स्वतः गणेश नाईक राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. त्यात भाजपाची राज्यातील सत्ता गेल्याने इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये आणण जवळपास अशक्य आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने नवी मुंबईत सक्रिय झालेली असताना स्वतः अजित पवार यांनी इथल्या राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी गणेश नाईक समर्थकांना नगरसेवक पदाच्या तिकिटीसकट महामंडळांचं आमिष दाखविण्यास सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या बाजूला मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी शहरात विविध आंदोलनं आणि सामाजिक उपक्रमांच्या मार्फत जोरदार मोर्चेबांधणी केल्याचं पाहायला मिळत आहे. स्वतः अमित ठाकरे यांनी देखील येथील आंदोलनात सहभाग नोंदवून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढल्याच पाहायला मिळालं होतं. परिणामी शहरात मनसेसाठी महानगर पालिकेच्या अनुषंगाने मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी अनुषंगाने येत्या ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन आहे. यंदाचा वर्धापन दिन सोहळा हा नवी मुंबईत आयोजित करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. पक्षाच्या वाढीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालिका निवडणुकीसाठी मनसेने नवनवीन रणनीती आखण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर मनसेनं पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार मनसे आता फक्त मुंबईपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर इतर ठिकाणीही मनसेचे कार्यक्रम घेणार आहे. या नव्या बदलाची सुरुवात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमापासून होणार आहे. येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे. यानिमित्ताने मनसेने ठाण्यात कार्यक्रम आयोजित केला आहे. तर यंदा मनसेचा वर्धापन दिनाचा सोहळाही नवी मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातच नव्हे तर राज्यभरात मनसेचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

 

 

News English Summery: On the other hand, MNS Navi Mumbai city president Gajanan Kale has seen strong mobilization in the city through various movements and social activities. Amit Thackeray himself was also involved in the agitation. As a result, there is a huge opportunity for the MNS in the Municipal Corporation. For this, March 8 is the anniversary of MNS. The anniversary of this year is reported to be held in Navi Mumbai. This decision has been taken by MNS president Raj Thackeray for the party’s growth..

 

Web Title: Story MNS Party new strategy for Navi Mumbai Municipal corporation election this year party anniversary celebration In Navi Mumbai.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x