तुम्ही जिम'मध्ये या औषधाचं सेवन करता? मग जिम ट्रेनर मेघनाचा मृत्यूचं मुख्य कारण वाचा
ठाणे : ठाण्यात राहणाऱ्या २२ वर्षीय महिलेने बंदी असलेले वजन कमी करण्याच्या गोळ्या घेतल्यानंतर काही तासातच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मेघना देवगडकर असे या महिला नृत्यांगनेचं नाव आहे. ती जिम ट्रेनर म्हणूनही काम करत होती. तिने बंदी असलेले औषध डिनिट्रोफेनॉल घेतले त्यानंतर १५ तासांच्या आत तिच्या मृत्यू झाल्याचे समोर आले होतं. सोमवारी मेघना देवगडकर एका जीममध्ये वर्कआऊट करण्यापूर्वी गोळी घेतली होती. या ठिकाणी काही काळापूर्वी तीने ट्रेनर म्हणून नोकरी जॉईन केली होती.
वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. मात्र हेच उपाय आपल्या जीवावर बेततात. अशाप्रकरणाची घटना ठाण्यात घडली होती. तिने वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्यामुळे काही तासातच तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. मेघना देवगडकरचा मृत अशा गोळ्याच्या सेवनामुळे झाला ज्या गोळ्या विक्रीवर आणि सेवनावर बंदी घातली होती. त्याच गोळ्याचे सेवन मेघनाने केलं होत असं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये आलं होतं.
बंदी घातलेल्या गोळया घेतल्यानंतर मेघनाला हायपरथरमियाचा त्रास सुरु झाला होता. तिच्या शरीरातील तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढले होते. रक्तदाब आणि ह्दयाचे ठोके वाढले असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे कार्डीअक अरेस्टने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अपघात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एफडीएला अहवाल पाठवण्यात आला होता. मेघनाला बंदी घातलेल्या गोळया कशा मिळाल्या त्या अनुषंगाने पुढील तपास सुरु होता.
औषधी गोळ्या खाल्ल्यानंतर काही तासात ठाण्यातील तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली होती. अखेर तिच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. मेघनाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करुन ऑनलाईन औषध विक्रीविरोधात दंड थोपटलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष संदीप पाचंगे यांना अन्न व औषध प्रशासनाकडून उत्तर आलं आहे. यानुसार मृत तरुणीने जिममधील ट्रेनर योगेश निकम यांच्या बॅगमधून डायनीट्रोफिनॉलच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. या घातक औषधांमुळे तिचा मृत्यू ओढवल्याचे अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
मेघनाने जिममधील ट्रेनर योगेश निकम यांच्या बॅगेतील डायनीट्रोफिनॉलच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. या औषधातील घटक अत्यंत हानिकारक असून या औषधाच्या उत्पादन व विक्रीस केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिलेली नाही. अशा प्रकारे अवैध औषधविक्री केल्यास कोरोनासारख्या विषाणूंचा फैलाव होऊ शकतो, अशी भीती पाचंगे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या परिमंडळ – 1 च्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांनी सांगितल्यानुसार परवानाधारक औषधविक्रेत्यांकडून ऑनलाईन औषध विक्री होत असल्याची बाब उपलब्ध नाही. मेघना हिने घेतलेले औषध आयुर्वेदिक नसून जिम ट्रेनरच्या बॅगेतील औषधे आहेत.
News English Summery: On February 10, the shocking incident of a Thane girl’s death took place in the wee hours after consuming the drug. The mystery of her death has finally been unraveled. Sandeep Panchange, vice president of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena, who has imposed fines against online drug sales after raising doubts about Meghan’s death, has received reply from the Food and Drug Administration. According to this, the deceased woman had consumed dinitrophenol from the bag of trainer Yogesh Nikam in the gym. The Food and Drug Administration said in response to the deadly drug overdose. Meghan had eaten dinitrophenol pills in gym bag trainer Yogesh Nikam’s bag. The ingredients of this medicine are very harmful and the production and sale of this drug is not approved by the Central and State Government. In this way, Panchang said in his statement that illicit drugs could spread the virus like corona. According to Assistant Commissioner of Food and Drug Administration Circle-1, Madhuri Pawar, it is not available that licensed pharmaceuticals are sold online. The medicine taken by Meghna is not Ayurvedic but it is the medicine in Jim Trainer’s bag.
Web News Title: Story Thane Meghans death is a mystery the shocking truth has come to light in JIM trainers death FDA report fact.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे