5 November 2024 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

नितेश राणेंचा सेनेला दणका; विद्यार्थ्यांच्या आडून १५० रु'चा हॅण्डवॉश १३०० रु खरेदी प्रस्ताव स्थगित

Shivsena, Uddhav Thackeray, Ekanth Shinde, Nitesh Rane

ठाणे : सत्ताधारी शिवसेना पक्ष सध्या स्थायी समितीच्या माध्यमातून टेंडरमध्ये नवनवे विक्रम करताना दिसत आहेत. महापालिकेच्या तिजोरीतून पैसे कसे उकळावे याबाबतीत ठाण्यातील गोल्डन गँगचा हात कोणीच पकडू शकत नाहीत. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पक्षासाठी फंडींगच्या अनुषंगाने टेंडरचा वापर केला जातो आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकांमध्ये असे प्रकार नित्याचे झाले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी ‘आपला दवाखाना’च्या अनुषंगाने आणि ठाण्यातील व्यवस्थेच्या नावाने देखील मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप याआधीच विरोधकांनी केला आहे.

दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हॅण्ड वॉश बसवण्याच्या वादग्रस्त प्रस्तावाला अखेर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थगिती दिली आहे. हॅण्ड वॉशच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आल्याने या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी हर्बल हॅण्ड वॉशच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी आमदार नितेश नारायणराव राणे यांनी विधानसभेत या विषयाला जोरदारपणे उचलून धरत सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला होता आणि निवडणुकीच्या तोंडावर विषय उचलला गेल्याने सत्ताधारी देखील मोठ्या राजकीय अडचणीत सापडले होते. तर सभागृहाबाहेर आणि ठाण्यात देखील स्वाभिमान संघटना आणि अन्य संस्थांनी आंदोलन केले. त्यानंतर जाग आलेल्या ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे.

आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरल्यानेच या प्रस्तावाला ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी स्थगिती दिली. यामुळे आमदार नितेश राणे यांचे ठाण्यातील दक्ष नागरिक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक यांनी जाहीर आभार मानले आहेत. ठाणे महापालिकेच्या वादग्रस्त हॅन्ड वॉश प्रस्तावाच्या विरोधात ठाणे मतदाता जागरण अभियान, स्वाभिमान आणि अन्य संस्थांनीही आंदोलन केले होते. आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला होता. अशी कोणती बॉटल आहे जिची किंमत १३०० रुपये आहे, असा सवाल करत नितेश राणे यांनी विधान सभेत या गैरव्यवहाराला वाचा फोडली होती.

विद्यार्थ्यांना हात स्वच्छ करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शाळेत पुढील वर्षभरात ११ हजार लिटर हॅण्ड वॉश खरेदीचा प्रस्ताव मंजुर केला होता. वर्षभरात ११ हजार लिटर हँडवॉशसाठी एक कोटी ४० लाखांचा खर्च येणार आहे. परंतु सध्या ठामपा शाळांची दूरवस्था आहे. या शाळेत पाण्याची सोयच नसेल आणि प्रसाधन व्यवस्था चांगली नसेल तर हे हॅण्ड वॉश काही दिवसातच शिक्षक, शालेय अधिकारी आणि नगररसेवकांच्या घरात वा कार्यालयात वापरले जातील असा संशयही ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने व्यक्त करण्यात आला होता. सध्या बाजारात केमिकलयुक्त हॅण्ड वॉश मिळत असल्याने विद्यार्थ्यांना केमिकल विरहित हर्बल हॅण्ड वॉश देण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. परंतु या प्रस्तावावरून मोठ्या प्रमाणात वादंग उठल्याने अखेर या प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x